Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे बेमुदत लेखणी बंद आंदोलन

najarkaid live by najarkaid live
September 26, 2019
in जळगाव
0
समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे बेमुदत लेखणी बंद आंदोलन
ADVERTISEMENT

Spread the love

समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे बेमुदत लेखणी बंद आंदोलन
जळगाव –  शासनाने दिनांक १८/०७/२०१९ रोजी ११६ गृहपाल पदे बाह्यस्त्राताद्वारे कंत्राटी पध्दतीने भरण्याबाबत मंजूरी दिली. समाज कल्याण विभागा कडून चालविण्यात येणारे मुलींची वसतिगृहे व निवासी शाळांमध्ये शासनाने कंत्राटी महिला गृहपाल नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया ब्रिस्क फॅसिलिटीज या खाजगी कंपनी मार्फत राबवली जाणार आहे. परंतू गृहपाल पद जबाबदारीचे असल्याने या पदावर शासकीय महीला कर्मचार्‍याची नियुक्ती होणे आवश्यक आहे. शासनाने हे धोरण रद्द करावे या मागणीसाठी समाज कल्याण कर्मचारी संघटना (गट-क) महाराष्ट्र राज्य, पुणे संघटनेने दि. २५/०९/२०१९ रोजी पासून राज्यभर बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. संदर्भात जळगांव जिल्हाधिकारी मा. डॉ. श्री. अविनाशजी ढाकणे यांना सविस्तर निवेदन देण्यात आले आहे. समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत असलेल्या राज्यभरातील मुलींच्या शासकीय वसतिगृह व निवासी शाळेत रिक्त असलेल्या ११६ गृहपाल पदावर कंत्राटी पद्धतीने महीला कर्मचार्‍यांच्या नियुक्त करण्यासाठी शासनाने दिनांक १८/०७/२०१९ रोजी मंजूरी दिली. त्यानुसार समाज कल्याण आयुक्त श्री. मिलिंद शंभरकर यांनी दि. १६/०९/२०१९ रोजी आदेश क्रमांक सकआ/आस्था-६/प्रक्रअ/कं.गृहपाल/ब्रिक्स/काआ/२०१९-२०/२१९४ ब्रिस्क फॅसिलिटीज या खाजगी कंपनी मार्फत महीला गृहपाल नियुक्त करण्याचे आदेश काढले. जिल्ह्यात मुलींची एकुण ५ वसतिगृहे असून पैकी अमळनेर वसतिगृहाचे गृहपाल पद रिक्त असून या पदाच अतिरिक्त प्रभार महीला कर्मचारी (समाजकल्याण निरीक्षक) जळगांव यांच्या कडे आहे. संपूर्ण महाराष्ट्रात रिक्त गृहपाल पदांची अशीच परिस्थिती असतांना सदरील पदाचे कर्तव्य समर्थपणे पार पाडण्यास पात्र कर्मचारी उपलब्ध असतांना त्यांना पदोन्नत करण्याचे सोडून शासनाने पदभार अनुभवहीन हातात देण्याचा निर्णय चुकीचा असून, यामुळे शासकीय पदांचे खाजगी करण होऊन शासकीय रोजगाराच्या संधी दिवसेंदिवस कमी होत आहे, पुढील पिढीचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. तसेच अनुभव हीन कंत्राटी कर्मचार्‍यांच्या हाती वसतिगृहातील मुलींचे जीवनमान व भवितव्य सुरक्षित राहणार नाही, कारण कंत्राटी कर्मचारी हे महाराष्ट्र सेवा अधिनियमास बाध्य नसतात. अशा परिस्थितीत वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थिनींच्या संभाव्य अव्यवस्थेस जबाबदार कोण हा प्रश्न उद्भवतो. असा कर्मचारी विरोधी व जन विरोधी निर्णय शासन रद्द करत नाही तो पर्यंत बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा ईशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे.
आंदोलनात सहभागी सहाय्यक आयुक्त योगेश पाटील व समाज कल्याण विभागाचे कर्मचारी

आंदोलनात श्रीमती. ए.के. बोरोले (उपाध्यक्ष), श्रीमती. व्हि. जी. पाटील (कोषाध्यक्ष), श्री. ए.पी. डोल्हारे (सचिव), श्री. एस.आर. पाटील (उपसचिव), श्री. आर.डी. पवार, श्रीमती. एस.एल. चौधरी, श्री. एम. डी. भिंगारे, श्री. डि. ए. सपकाळे’ श्री. के. व्ही. पाटील, श्री. एम. ए, चौधरी, श्री. डि. व्हि. साबळे, श्री. आर. सी. पाटील, श्री. एस. पी. साबळे, श्री. एस. आर. उनवणे, श्री. एस.आर. सोनवणे, श्री. ए. जी. वाणी श्री. पी.डी. पाटील, श्री. पी.एस. पाटील, श्री. ए.बी. पाटील, श्री. आर.सी. पाटील, श्री. पी.डी. वडतकर, श्री. सी.एस. वामनाचार्य, श्री. व्ही.एन. वसतकार, श्री. एस.आर. सोनवणे, श्री. आर.आर. बारी, श्री. सी.एन. महाले, श्री. डी.आर. जोहरे यांच्यासह जळगांव जिल्ह्यातील समस्त कर्मचार्‍यांनी सहभाग नोंदवला आहे, तसेच आंदोलनास वर्ग १ व २ अधिकार्‍यांचे समर्थन प्राप्त आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ईडीच्या कार्यालयाबाहेर गर्दी करू नकाः-पवार

Next Post

युतीच्या जागा वाटपाचं त्रांगडं; खोत यांना हव्यात १२ जागा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
युतीच्या जागा वाटपाचं त्रांगडं; खोत यांना हव्यात १२ जागा

युतीच्या जागा वाटपाचं त्रांगडं; खोत यांना हव्यात १२ जागा

ताज्या बातम्या

Stocks to Watch Today : आज शेअर बाजारात 'या' कंपन्यांवर गुंतवणूकदारांची नजर; Adani Power ते Waaree Energies चर्चेत

Stocks to Watch Today : आज शेअर बाजारात ‘या’ कंपन्यांवर गुंतवणूकदारांची नजर; Adani Power ते Waaree Energies चर्चेत

March 16, 2026
Bank Holiday March 2026 : पुढील आठवड्यात सलग सुट्ट्या; 'या' तारखांना बँका बंद 

Bank Holiday March 2026 : पुढील आठवड्यात सलग सुट्ट्या; ‘या’ तारखांना बँका बंद 

March 16, 2026
Jalgaon Crime News : शीतपेयातून गुंगीचे औषध देत अत्याचार

Jalgaon Crime News : शीतपेयातून गुंगीचे औषध देत अत्याचार

March 16, 2026
कीर्तनकाराचा विकृत चेहरा उघड! अल्पवयीन मुलीला चटके देत अत्याचार; महाराष्ट्र हादरला!

कीर्तनकाराचा विकृत चेहरा उघड! अल्पवयीन मुलीला चटके देत अत्याचार; महाराष्ट्र हादरला!

March 16, 2026
1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

March 15, 2026
LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

March 15, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us