Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विश्व नवकार दिवसा निम्मित सर्व धर्मीय बंधू भगिनींची जाहिर प्रार्थनेचे आयोजन

एकाच वेळी १०८ देशांसह भारतात ६००० ठिकाणी नवकार महामंत्राचा जप 

najarkaid live by najarkaid live
April 8, 2025
in धार्मिक
0
विश्व नवकार दिवसा निम्मित सर्व धर्मीय बंधू भगिनींची जाहिर प्रार्थनेचे आयोजन
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव दि.८ प्रतिनिधी –  जळगावकरांसाठी एक ऐतिहासिक आणि मंगलमय संधी येत्या ९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ठीक ८:०१ वाजता, खान्देश सेंट्रल ग्राउंड येथे विश्व नवकार महासंमेलन दिन आयोजित केला आहे. या पवित्र आणि महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व धर्मीय बंधू-भगिनींना JITO जळगावच्या वतीने निमंत्रण देण्यात येत आहे.

‘विश्व कल्याणासाठी एकत्र येऊया आणि नवकार महामंत्राचा सामूहिक जप करून शांती आणि सद्भावनेचा संदेश देऊया !’ या उद्देशाने विश्वशांतीसाठी सामुदायिक नवकार महामंत्र जप हा दिवस केवळ जळगावसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एक विशेष पर्वणी आहे. या दिवशी सामुदायिक नवकार महामंत्राचा जप आयोजित केला जाणार आहे. विशेष म्हणजे, एकाच वेळी १०८ देशांमध्ये आणि भारतातील ६००० ठिकाणी हा शांतीमंत्र गुंजणार आहे.

या कार्यक्रमाची महती आणखी वाढवणारी बाब म्हणजे, भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी हे देखील ऑनलाइनच्या माध्यमातून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असतील. नवकार महामंत्र शांती आणि सद्भावनेचा दिव्य संदेश दिला जाणार आहे. नवकार महामंत्र, केवळ एक प्रार्थना नाही, तर तो संपूर्ण जगासाठी शांती आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. या मंत्राच्या माध्यमातून आपण अनेक आध्यात्मिक विभूतींना वंदन करतो.

नवकार मंत्राचा अर्थ

  • णमो अरिहंताणं – अर्थात, ज्यांनी संपूर्ण ज्ञान प्राप्त केले आहे, त्या अरिहंतांना आमचे नमन.

  • णमो सिद्धाणं – मोक्षपदाला पोहोचलेल्या सिद्धांना आमचा प्रणाम.

  • णमो आयरियाणं – धर्माचे मार्ग दाखवणारे आचार्यांना आमचे वंदन.

  • णमो उवज्जायाणं – आध्यात्मिक गुरुंना आमचा नमस्कार.

  • णमो लोए सव्व साहूणं या जगात असलेल्या सर्व साधू-संतांना आमचे विनम्र अभिवादन.

या भव्य कार्यक्रमाचे आयोजन JITO जळगावच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या पवित्र कार्यात जिल्ह्यातील सर्व धर्मीय धर्मगुरु, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, तसेच सर्व समाजातील, प्रमुख व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.  JITO जळगावचे अध्यक्ष सुभाष लोढा, चीफ सेक्रेटरी प्रशांत छाजेड आणि प्रोजेक्ट चेअरमन विनय पारख यांनी जळगाव शहरातील सर्व नागरिकांना या पवित्र आणि ऐतिहासिक क्षणी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’चा आढावा

Next Post

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

Related Posts

Mahakal Mandir Aarti : भस्म शृंगार आरती – उज्जैन महाकाल मंदिरातील दिव्य आरतीचे रहस्य

Mahakal Mandir Aarti : भस्म शृंगार आरती – उज्जैन महाकाल मंदिरातील दिव्य आरतीचे रहस्य

August 4, 2025
Nag Panchami 2025: नागपंचमीला का टाळतात चिरणे, भाजणे, तळणे? धार्मिक आणि शास्त्रीय कारण काय?

Nag Panchami 2025: नागपंचमीला का टाळतात चिरणे, भाजणे, तळणे? धार्मिक आणि शास्त्रीय कारण काय?

July 28, 2025
गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आणि इतर महत्त्वाचे वेळा संपूर्ण जाणून घ्या…

गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आणि इतर महत्त्वाचे वेळा संपूर्ण जाणून घ्या…

March 29, 2025
नवीन वर्षात विक्रम मोडला, गोवा नव्हे तर अयोध्या ठरली पहिली पसंती

रामललासाठी ८ किलो सोने-चांदींपासून बनविली पादुका !

January 11, 2024
राम मंदिरात बसवले जाणार सुवर्णजडित दरवाजे; महाराष्ट्रातील लाकूड, आणि तामिळनाडूचे कारागीर देत आहेत आकार

श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच जाणार नाही काँग्रेस; नाकारले निमंत्रण

January 11, 2024
रामराज्य येत आहे, चांगल्या गोष्टी घडतील; देशासाठी सोहळा महत्त्वाचा- मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

रामलल्लांची मूर्ती होणार सुवर्ण सिंहासनावर विराजमान !

January 7, 2024
Next Post
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

ताज्या बातम्या

RBI Forex Update: डॉलर इंडेक्स घसरला, शॉर्ट पोझिशनही घटली ; $3.6 अब्ज नेट सेल,RBI ची मोठी हालचाल

RBI Forex Update: डॉलर इंडेक्स घसरला, शॉर्ट पोझिशनही घटली ; $3.6 अब्ज नेट सेल,RBI ची मोठी हालचाल

August 31, 2025
Reliance Jio IPO : २०२६ मध्ये धडाकेबाज एन्ट्री, पण गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल का?

Reliance Jio IPO : २०२६ मध्ये धडाकेबाज एन्ट्री, पण गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल का?

August 31, 2025
सणासुदीला खरेदी ऑफर? Zero-Cost EMI खरंच मोफत आहे का? जाणून घ्या लपलेल्या अटी व खर्च

सणासुदीला खरेदी ऑफर? Zero-Cost EMI खरंच मोफत आहे का? जाणून घ्या लपलेल्या अटी व खर्च

August 31, 2025
Paytm UPI Update: 31 ऑगस्टपासून Paytm UPI बंद होणार का? कंपनीचा मोठा खुलासा

Paytm UPI Update: 31 ऑगस्टपासून Paytm UPI बंद होणार का? कंपनीचा मोठा खुलासा

August 30, 2025
Jalgaon Breking news : यावल जवळ तरुणाचा खून!

Jalgaon Breking news : यावल जवळ तरुणाचा खून!

August 30, 2025
बाजारातील धोक्यापासून Mutual Funds बचावसाठी TREPS झाला नवा ‘सेफ झोन’

बाजारातील धोक्यापासून Mutual Funds बचावसाठी TREPS झाला नवा ‘सेफ झोन’

August 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us