Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधानसभेत महायुतीचा झेंडा फडकेपर्यंत थांबणार नाही

आमदारांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

najarkaid live by najarkaid live
June 9, 2024
in Uncategorized
0
विधानसभेत महायुतीचा झेंडा फडकेपर्यंत थांबणार नाही
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी केलेला खोटा प्रचार फार दिवस टिकणारा नाही.विरोधकांच्या अपप्रचाराला योग्य उत्तर देऊन  विधानसभा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकविल्याखेरीज मी थांबणार नाही, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला. भाजपा आमदारांच्या बैठकीत श्री. फडणवीस बोलत होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार,मुंबई अध्यक्ष आ.आशीष शेलार, प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, आ.प्रवीण दरेकर आदी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत श्री.फडणवीस यांच्याशिवाय सरकार मंजूर नाही, असा ठराव  सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी निकालाची आकडेवारी मांडून महायुतीचा पराभव झाला हा प्रचार खोटा असल्याचे दाखवून दिले. श्री. फडणवीस म्हणाले की, या निवडणुकीमध्ये भाजपाचे नेतृत्व मी केल्यामुळे  या निकालाची जबाबदारी माझी आहे. आपण सर्वांनी अतिशय उत्तम काम केलं. केवळ राजकीय गणित जुळवाजुळवीमध्ये आम्ही  कमी पडलो. मला मोकळं करून काम करायची संधी द्या, असे मी निराशेतून बोललो नाही.देवेंद्र फडणवीस हा पळणारा नाही, तर लढणारा आहे.

             चारही बाजूनी  घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि नंतर पुन्हा पूर्ण ताकदीने मैदानात उतरून ते सर्व किल्ले पुन्हा जिंकणारे छत्रपती शिवाजी महाराज आमची प्रेरणा आहेत.कोणाला जर असं वाटलं असेल की मी निराश झालो आहे आहे तर ते खरं नाही. माझ्या डोक्यात काही रणनीती होती आणि ती आजही आहे,असेही श्री.फडणवीस म्हणाले.उबाठा ला मुंबई महानगर क्षेत्रात मतदारांनी नाकारले असल्याचे श्री. फडणवीस यांनी निकालाच्या आकडेवारीसह निदर्शनास आणून दिले. श्री. फडणवीस म्हणाले संविधान बदल, मराठा आरक्षण यासारख्या मुद्द्यावर खोटी माहिती पसरवून त्या आधारे महाविकास आघाडीने विजय मिळवला.हा खोटा प्रचार विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार नाही. त्या मुळे आपण सर्वांनी आतापासून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, असेही श्री.फडणवीस यांनी नमूद केले.

श्री. देवेंद्र फडणवीस हे बाहेर राहून सरकार मान्य नाही, असा ठराव मुंबई अध्यक्ष आ. आशीष शेलार यांनी मांडला.आ. शेलार म्हणाले की,देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय आयुष्याचा लेखाजोखा जेव्हा मांडला जाईल तेव्हा त्यात 2019-24 या काळात त्यांनी संकटांचा मुकाबला कसा केला, याचा गौरवशाली अध्याय लिहिला जाईल. त्यामुळे श्री.फडणवीस यांच्या अनुपस्थितीत सरकार भाजपा विधीमंडळ पक्षाला मान्य नाही.या ठरावाला उपस्थित सर्व आमदारांनी  उभे राहून, टाळ्या वाजवून अनुमोदन दिले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, स्वतःला मागे ठेवून आमदार आणि कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे म्हणून श्री.फडणवीस काम करतात. 42 खासदार आणि 122 आमदार असा विक्रम मोदीजींच्या यांच्या नेतृत्वाखाली श्री.फडणवीस यांनीच केला. श्री.फडणवीस हे सरकारमध्ये नसणे हे आम्हाला मान्य नाही. आ.नितेश राणे यांनीही श्री.फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शविणारे भाषण केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

२६ व्या आशियाई युवा बुद्धिबळसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती

Next Post

मोदी मंत्रिमंडळाचा आज शपथविधी ; महिलांमधून मंत्रिपदाची रक्षा खडसेनां संधी?

Related Posts

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Next Post
Raver Loksabha : भाजपा उमेदवार रक्षा खडसेंच्या उमेदवारी अर्जावर घेतलेला आक्षेप फेटाळला, तक्रारदार कोर्टात दाद मागणार

मोदी मंत्रिमंडळाचा आज शपथविधी ; महिलांमधून मंत्रिपदाची रक्षा खडसेनां संधी?

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन : गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

March 9, 2026
अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

March 9, 2026
Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us