Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळणाऱ्या सत्ताधाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा- रविंद्र भैय्या पाटिल

najarkaid live by najarkaid live
October 17, 2024
in Uncategorized
0
महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळणाऱ्या सत्ताधाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा- रविंद्र भैय्या पाटिल
ADVERTISEMENT

Spread the love

सावदा, ता. रावेर(रवि महाजन ) मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024 च्या पाश्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ,महाविकास आघाडीचे ध्येय धोरणे, विकास कामे मतदारांपर्यंत पोहचवून मतदारांसोबत संवाद साधण्यासाठी गाव भेट संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे
बोदवड तालुक्यातील गाव भेट संवाद दौऱ्याचा शुभारंभ शिरसाळा येथे श्री सिद्धेश्वर हनुमानजींचे दर्शन घेऊन
पक्षाचे जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटिल आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला
यानंतर रविंद्र भैय्या पाटिल, रोहिणी खडसे आणि पदाधिकाऱ्यांनी शिरसाळा, चिंचखेडा सिम, कोल्हाडी, हिंगणे, आमदगाव आणि बोदवड शहरातील विविध प्रभागात भेटी देऊन ग्रामस्थ नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या
याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटिल म्हणाले हा मतदारसंघ कायम शरद पवार यांच्या धर्मनिरपेक्ष व विकासाभिमुख विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहिला आहे
राज्यातील सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले असुन ते आता विविध योजनांच्या माध्यमातून प्रलोभने दाखवून आपल्या वरील गद्दारीचा शिक्का पुसु पाहत आहेत आणि मतदारांना विकत घेऊ पाहत आहेत परंतु या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळणाऱ्या गद्दारांना मातीत गाडून धडा शिकवा महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष , महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठिशी उभे राहण्याचे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या
सत्ताधाऱ्यांनी महागाई कमी करण्याचे, शेतमालाला हमीभाव देण्याचे युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते परंतु सत्ताधाऱ्यांनी शेतकरी, कष्टकरी, महिला युवकांच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष केले आणि आता निवडणुकीच्या तोंडावर विविध योजना जाहीर केल्या परंतु एका हाताने मदत देत असताना दुसरीकडे प्रचंड महागाई करून दिलेली मदत काढून घेण्याचे काम सत्ताधारी करत आहेत आपल्या मतदारसंघात आ एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली परंतु
गेल्या पाच वर्षात या मतदारसंघाचा विकास रखडला आहे रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी, आ एकनाथराव खडसे यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या बोदवड उपसा सिंचन योजना आणि इतर योजना राजकीय द्वेषभावनेतून निधी अभावी रखडलेल्या आहेत या योजनांना निधी उपलब्ध करून देऊन त्या पुर्णत्वास नेऊन शेतीला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून विधानसभा निवडणुकीत साथ व आशीर्वाद देण्याचे रोहिणी खडसे यांनी उपस्थितांना आवाहन केले

यावेळी जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, , तालुका अध्यक्ष प्रशांत( आबा )पाटिल , बाजार समिती उपसभापती ज्ञानेश्वर पाटिल
कैलास चौधरी, रामदास पाटिल
अनिल पाटील,अनिल वराडे,विलास देवकर,सतिष पाटिल, निलेश पाटिल, किशोर गायकवाड,गणेश पाटिल ,मधुकर पाटिल, रामभाऊ पाटिल, डॉ ए एन काजळे, भरत अप्पा पाटिल, वामन ताठे,सुभाष पाटिल, विनोद कोळी, शाम सोनवणे, विश्वनाथ पाटिल, गोपाळ गंगतिरे,के एस इंगळे, प्रमोद शेळके, रामराव पाटिल, शांताराम पाटिल, हकीम बागवान ,प्रविण पाटिल,प्रमोद फरफट,निलेश पाटिल , सचिन राजपुत ,आनंदा पाटिल,प्रफुल लढे ,चंद्रकांत देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अध्यात्मिक उन्नतीसाठी शिवमहापुराण कथा लाभदायी : आ. राजूमामा भोळे

Next Post

Breaking : वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, नगरदेवळ्यातील धक्कादायक घटना

Related Posts

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
Next Post

Breaking : वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, नगरदेवळ्यातील धक्कादायक घटना

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us