Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घरकुल घोटाळा: जैन यांना ७ तर देवकर यांना ५ वर्षाचा कारावास

najarkaid live by najarkaid live
August 31, 2019
in जळगाव
0
घरकुल घोटाळा: जैन यांना ७ तर देवकर यांना ५ वर्षाचा कारावास
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव- बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन यांना सात वर्षांची शिक्षा आणि १०० कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांनाही ५ वर्षांची शिक्षा आणि ५ लाखाचा दंड ठोठावण्यात आला. तर माफीच्या साक्षीदार सिंधू विजय कोल्हे यांची याप्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. धुळे जिल्हा न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. 

धुळे जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश सृष्टी नीलकंठ यांनी घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह ४८ आरोपींना दोषी ठरवले होते. त्यानंतर आज सायंकाळी या आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. घरकुल घोटाळ्याप्रकरणी धुळे न्यायालयाने सुरेश जैन यांना ७ वर्षाची शिक्षा आणि १०० कोटींचा दंड ठोठावला आहे. गुलाबराव देवकर यांना ५ वर्षाची शिक्षा आणि ५ लाखाचा दंड, बिल्डर जगन्नाथ वाणी, राजेंद्र मयुर यांना ७ वर्षाची शिक्षा आणि ४० कोटीचा दंड आणि प्रदीप रायसोनीला ५ वर्षाची शिक्षा आणि १० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

काय आहे हा घोटाळा
‘घरकुल योजना’ ही जळगाव नगरपालिकेची योजना होती.
झोपडपट्टीत राहणाऱ्यांना स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी आणि झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
१९९९मध्ये हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी सुमारे ११० कोटींचे कर्ज काढून ११ हजार घरकुले बांधण्याच्या कामास सुरुवात झाली होती.
मात्र २००१मध्ये या योजनेत घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं होतं
ज्या जागेवर घरकुल बांधण्यात आले होते, ती जागाही पालिकेच्या मालकीची नसल्याचं उघड झालं होतं
अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, मनमानी पद्धतीने निर्णय, गैरव्यवहारही उघडकीस आले होते
सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील खानदेश बिल्डर्सला हे काम दिले. त्याला नियमबाह्य पद्धतीने सुमारे २९ कोटी रुपये बिनव्याजी आणि आगाऊ दिले होते
ठेकेदाराने वेळेत ही घरे बांधून दिली नाही, तरीही त्याच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या ही बाब लक्षात आल्यावर ३ फेब्रुवारी २००६ रोजी शहर पोलीस ठाण्यात घरकुल योजनेत २९ कोटी ५९ लाख नऊ हजार रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार नोंदवली होती

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आगामी विधानसभेत विरोधीपक्षनेता वंचितचाच – मुख्यमंत्री फडणवीसांचे सूचक वक्तव्य !

Next Post

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत गो.पु.पाटील,कनिष्ठ महाविद्यालयास दुहेरी मुकूट !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत गो.पु.पाटील,कनिष्ठ महाविद्यालयास दुहेरी मुकूट !

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत गो.पु.पाटील,कनिष्ठ महाविद्यालयास दुहेरी मुकूट !

ताज्या बातम्या

Instagram Crime : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओने ब्लॅकमेल

March 13, 2026
Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

Gas Booking : युद्धाचे परिणाम...फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

Gas Booking : युद्धाचे परिणाम…फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

March 13, 2026
Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us