Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोनाचा नवा ‘व्हेरिएंट ; जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यंत्रणा अलर्ट

najarkaid live by najarkaid live
December 23, 2023
in जळगाव
0
कोरोनाचा नवा ‘व्हेरिएंट ; जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यंत्रणा अलर्ट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी): देशासह राज्यात कोरोनाने पुन्हा डोकेदुखी वाढवली असून पुन्हा एकदा राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. यावेळी कोरोनाचा JN1 जेएन–वन हा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. दिवसेंदिवस या व्हेरीएंटचे रुग्ण वाढतांना दिसत असल्याने आरोग्य यंत्रनेचे टेन्शन वाढवलं आहे या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाकडून सर्वच आरोग्य यंत्रणांना अलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यंत्रणा अलर्ट

JN1 जेएन–वन हा नवा व्हेरिएंट आढळून आल्यानंतर जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील यंत्रणा देखील अलर्ट कारण्यात आली आहे. या रुग्णासाठी GMC जीएमसीमध्ये १०० बेड व ५० व्हेंटिलेटर राखीव ठेवण्यात आले आहेत. राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांनंतर आवश्यकतेनुसार अधिक सुविधा वाढविण्यात येतील अशी माहिती जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.दरम्यान JN1 जेएन–वन हा नवा व्हेरिएंट आढळून आला असला तरी जळगाव जिल्ह्यात अजून तरी या व्हेरिएंटचा रुग्ण मिळून आलेला नाही तरीही काळजी म्हणून आरोग्य यंत्रणा अलर्टमोड आहेत.

संशयितांच्या तात्काळ तपासण्या

जळगाव जिल्ह्यात संशयित रुग्ण आढळल्यास तात्काळ तपासणी करण्यात येणार असून त्यासाठी किट देखील जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची उपलब्ध आहेत तसेच १०० बेड,५० व्हेंटिलेटर राखीव ठेवण्यात आले असून  लस व औषध साठा पुरेसा उपलब्ध आहे.विलगीकरण बेड्स, आयसीयू बेइस, व्हेंटिलेटर बेड्सही तयार करण्यात आले आहे.

घाबरू नका… काळजी घ्या 

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हा ओमिक्रॉन व्हेरिएंटचा सब व्हेरिएंट आहे.सध्या तरी जळगाव जिल्ह्यात या नव्या  JN1 जेएन–वन नवीन व्हेरिएंटचा एकही रुग्ण नाही. या व्हेरिएंटमुळे भीती बाळगण्याची गरज नाही.परंतु काळजी घेण्याबाबत प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

जेएन.१ इतर कोरोना प्रकारांपेक्षा जास्त संसर्गजन्य किंवा गंभीर आहे का?

JN.1 BA.2.86 शी संबंधित आहे जो Omicron चा वंशज आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली होती. तज्ञांच्या मते, दोन्ही रूपे जवळजवळ समान आहेत. त्यांच्या स्पाइक प्रथिनांमध्ये फारच थोडा फरक आहे. स्पाइक प्रोटीन हा विषाणूचा भाग आहे ज्यामुळे तो मानवी पेशींवर हल्ला करू शकतो. नवीन प्रकार रोगप्रतिकारक शक्तीला चकित करण्यासाठी अधिक प्रभावी आहे. म्हणजे संसर्ग होण्याची शक्यताही वाढते.

कोविड प्रकार JN.1 ची लक्षणे कोणती आहेत?

कोरोना JN.1 च्या नवीन प्रकाराच्या लक्षणांमध्ये या गोष्टींचा समावेश आहे: ताप थकवा वाहती सर्दी घसा खवखवणे डोकेदुखी खोकला गर्दी काही प्रकरणांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या

WHO चे जेएन-वन नवीन व्हेरिएंट बद्दल काय म्हणते 

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) JN.1 ला ‘वैरिएंट ऑफ इंटरेस्ट’’ म्हणून घोषित केले आहे. यामुळे जागतिक सार्वजनिक आरोग्याला फारसा धोका नाही, असेही डब्ल्यूएचओने म्हटले आहे. संस्थेच्या म्हणण्यानुसार, तो आता BA.2.86 च्या वंशाचा आहे जो ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन शेअरिंग ऑल इन्फ्लुएंझा डेटा (GISAID) शी संबंधित आहे. तथापि, अलिकडच्या आठवड्यात अनेक देशांमध्ये JN.1 ची प्रकरणे समोर येत आहेत. त्याचा प्रसार जागतिक स्तरावर झपाट्याने वाढला आहे.

काळजी घेण्यासाठी नेमकं काय कराल…

देशात कोविड-19 प्रकरणांमध्ये नुकत्याच झालेल्या वाढीदरम्यान, डॉक्टरांनी लोकांना मास्क घालण्याचा, गर्दी टाळण्याचा आणि सकस आहार घेण्याचा सल्ला दिला आहे. JN.1 प्रकाराबाबतही अशीच सावधगिरीची पावले उचलावी लागतील.

 खबरदारीचे उपाय खालीलप्रमाणे

 साबण आणि पाण्याने किमान 20 सेकंद हात धुवा साबण आणि पाणी उपलब्ध नसल्यास, कमीतकमी 60 टक्के अल्कोहोलसह हँड सॅनिटायझर वापरा. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे मास्कने नाक आणि तोंड व्यवस्थित झाकणे दोन व्यक्तिमधील अंतर ठेवा.

इतर बातम्या….

शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञान शोधून काढलं ; माणसाचा मृत्यू कधी होणार हे समजू शकणार

पतीने केला तरी बलात्कार हा बलात्कारच असतो… वैवाहिक बलात्कारावर हायकोर्ट काय म्हणाले वाचा !

कायद्यात बदल ; आता तारीख पे तारीख होणार नाही… खुनाचे कलम ३०२ नव्हे तर आता १०१ असेल, बलात्काराच्या कलम मध्येही बदल

Spread the love
Tags: #JMC#JN1#शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय
ADVERTISEMENT
Previous Post

सौ. वैशालीताई सुर्यवंशी समाजभान असलेलं दमदार नेतृत्व

Next Post

मनोज जरांगे यांची आज इशारा सभा ; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मनोज जरांगे यांची आज इशारा सभा ; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार

मनोज जरांगे यांची आज इशारा सभा ; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us