जामनेर,(प्रतिनिधी)- कोरोना आजाराला प्रतिबंध करण्यासाठी श्री.माऊली होमिओपॅथी हॉस्पिटलच्या वतीने रोग प्रतिकार शक्ती वाढवणारी मेडिसिन आज नेरी बु!! ग्रामपंचायत, जिल्हा उपरुग्णालय,पोलीस स्टेशन नेरी,बँक ऑफ बडोदा (देना बँक), जळगांव जिल्हा सहकारी बँक, या ठिकाणचे सर्व कर्मचारी बंधूं व पत्रकार यांना सोशल डिस्टन्स ठेऊन किशोर खोडपे नेरी यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आले,काही ठिकाणी हॉस्पिटलचे संचालक डॉ.दुर्गासिंग जाधव यांनी व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांशी संवाद साधला या वेळी त्यांनी होमिओपॅथी मेडिसिन चे महत्व व कशाप्रकारे मेडिसिन काम करू शकते करोना आजाराला प्रतिबंध करण्यासाठी स्वच्छता,सामाजिक अंतराचे पालन व घरी राहणे या तीन उपयांबरोबरच रोग प्रतिकार शक्ती वाढवणे हा अतिशय परिणाम कारक उपाय आहे व संपुर्ण महाराष्ट्र भर अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचारी बांधवांना व सामाजिक कार्यकर्ते यांना सामाजिक भावनेतून मेडिसिन मोफत देण्याचा उपक्रम राबविणार अशा सर्व गोष्टींचा साधर्म्य साधत डॉ.जाधव यांनी मार्गदर्शन केले.या वेळी उपस्थित सरपंच अरविंद खोडपे, वैद्यकीय अधिकारी डॉ.नरेश पाटील,बडोदा बँक (देना बँक)व्यवस्थापक अमोल पाटील साहेब,जिल्हा बँक व्यवस्थापक आर.एम.बालबुद्धे साहेब,पत्रकार सचिन पाटील,प्रदिप चोपडे,विवेक कुमावत,अनिकेत खोडपे, व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.