बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही भरती कॉम्प्रिहेन्सिव्ह थॅलॅसेमिया केअर, बालरोग रक्तदोष, कर्करोग आणि बोनमॅरो ट्रान्सप्लान्टेशन केंद्र बोरिवली येथे होणार आहे.
इच्छुक उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून, वैद्यकीय सल्लागार, कनिष्ठ सल्लागार (बालरोग), सहाय्यक अधिकारी, त्वचारोग तज्ञ, नर्स, कनिष्ठ औषध निर्माण अधिकारी, रिसेप्शनिस्ट आणि डेटा एंट्री ऑपरेटर अशा विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. वैद्यकीय संक्रमण सल्लागार आणि कनिष्ठ सल्लागार (बालरोग) पदासाठी MD/DNB किंवा समतुल्य पदवी आवश्यक आहे, तर अतिदक्षता बालरोग तज्ञ पदासाठी MBBS पूर्ण असणे गरजेचे आहे. सहाय्यक अधिकारी पदासाठी संबंधित क्षेत्रातील अनुभव असावा, तर नर्स पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेतून नर्सिंगचे शिक्षण आवश्यक आहे. कनिष्ठ औषध निर्माण अधिकारी पदासाठी औषधनिर्माण विषयातील पदवी अनिवार्य आहे. रिसेप्शनिस्ट आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी संगणक कौशल्य आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
उमेदवारांना अर्ज ऑनलाइन स्वरूपात सादर करावा लागेल. www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर अर्ज प्रक्रिया सुरू असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १ एप्रिल २०२५ आहे. अर्ज करताना उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे. BMC द्वारे जाहिरातीमध्ये विविध पदांसाठी वेगवेगळी वेतनश्रेणी निश्चित करण्यात आली आहे. वैद्यकीय सल्लागार पदासाठी ₹२,१६,०००/- प्रति महिना, कनिष्ठ सल्लागार पदासाठी ₹१,५०,०००/- प्रति महिना, तर सहाय्यक अधिकारी पदासाठी ₹९०,०००/- प्रति महिना वेतन निश्चित करण्यात आले आहे. इतर पदांसाठी वेतन पदानुसार दिले जाणार आहे.
उमेदवारांनी अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करावीत. अर्जाची अंतिम तारीख लक्षात घेऊन वेळेत अर्ज करावा आणि भरती प्रक्रियेसाठी BMC च्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी अपडेट पाहावेत. ही सुवर्णसंधी असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. १ एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. उमेदवारांनी लवकर याबाबत निर्णय घेऊन अर्ज करण्यास सुरुवात करावी.