मुंबई, (प्रतिनिधी)- आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस CM Devendra fadanvis शपथ घेणार आहे. त्याशिवाय उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे शपथ घेणार आहेत. या तिघांशिवाय इतर कोणाचाही मंत्री म्हणून शपथविधी पार पडणार नाही. त्यामुळे इतर आमदारांचा मंत्री म्हणून शपथविधी हा राजभवनात पार पडणार आहे. राजभवनात 7 डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे.
आजच्या शपथविधीनंतर उर्वरित आमदारांचा शपथविधी हा 7 डिसेंबर रोजी राजभवनात होणार आहे. 7 डिसेंबर रोजी राजभवनात 31 आमदारांना मंत्री पदाची शपथ दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, कोणत्या पक्षाला कोणते खातं मिळणार, यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे. यामुळे 7 डिसेंबरपर्यंत खात्यांबाबत महायुतीत खलबतं सुरुच राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.