पाचोरा-भडगाव,(प्रतिनिधी)- जातीपाती, धर्मा-धर्मामध्ये भांडण लावून स्वतःची राजकीय पोळी भाजणाऱ्या महायुतीला तडीपार करण्यासाठी मविआच्या मागे खंबीरपणे उभा राहून वैशालीताई सूर्यवंशी यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचं आवाहन आ. रोहित पवार यांनी मविआ च्या पाचोरा-भडगाव विधानसभेच्या अधिकृत उमेदवार वैशालीताई सुर्यवंशी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभे दरम्यान केले.
मविआ च्या पाचोरा-भडगाव विधानसभेच्या अधिकृत उमेदवार वैशालीताई सुर्यवंशी यांच्या प्रचारार्थ आ. रोहित पवार यांची जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.जातीपाती, धर्मा-धर्मामध्ये भांडण लावून स्वतःची राजकीय पोळी भाजणाऱ्या महायुतीला तडीपार करण्यासाठी मविआच्या मागे खंबीरपणे उभा राहून वैशालीताई सूर्यवंशी यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचं आवाहन यावेळी आ. रोहित पवार यांनी केलं.
यावेळी दिपक पाटील, प्रमोद पाटील, दिपक राजपूत, सुनिल पाटील, श्रीराम पाटील, एजाज भाई, करण पावर, डॉ.संजीवन पाटील, कमलाताई पाटील, दिलीप शेंडे, सुरेश पाटील, भूषण पाटील यांच्यासह मविआचे स्थानिक पदाधिकारी, सहकारी कार्यकर्ते, महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मतदार संघात भावा विरुद्ध लाडकी बहीण निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही शिवसैनिक आहे. मात्र आता एक जण शिंदे सेनाचा तर दुसरा ठाकरे सेनेचा उमेदवार आहे. त्यामुळे या बहीण भावातील ही लढत लढवेधी ठरणार आहे. त्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदार संघात किशोर पाटील हे विद्यमान आमदार आहेत. ते शिवसेनेकडून आमदार झाले होते. मात्र शिवसेनेत फुट पडल्यानंतर किशोर पाटील यांनी ठाकरें ऐवजी शिंदेंना साथ दिली. शिंदेंनी त्यांना पुन्हा एकदा पाचोरा विधानसभा मतदार संघातून संधी दिली आहे. तर त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने त्यांच्या बहीण वैशाली सुर्यवंशी यांना मैदानात उतरवले आहे. या निमित्ताने वैशाली सुर्यवंशी यांनी आपला भाऊ विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्यावर सडकून टिका केली आहे.