जळगाव,(प्रतिनिधी)- शिवसेनेचे प्रभावी नेते गुलाबराव पाटील यांचा तडाखेबाज प्रचार भोकर पंचायत समिती गणातील आमोदा खु, घार्डी, धानोरा खु., करंज, सावखेडा खु., किनोद, भादली खु., भोकर, पळसोद, जामोद, आमोदा बु. या परिसरात संपन्न झाला. यावेळी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत अबाल-वृद्ध, महिलांचा उस्फूर्त उत्साहाने सहभाग दिसून आला. मागील कार्यकाळात या भागातील जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता करून खेडी – भोकर – पुलासाठी 152 कोटींचा निधी मंजूर करून युध्द पातळीवर पुलाचे काम सुरु केले. तसेच जळगाव – खेडी – भोकर – चोपडा रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरणासारखी विकासकामे हाती घेतल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी गुलाबराव पाटील याना सांगितले की, तुम्ही वाचनाला खरे उतरलेले नेते असून तुम्ही दिलेला शब्द पाळला आहे. “आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आहोत” अशी भावना व्यक्त केली. त्यांच्या सोबत भाजपा, शिवसेना, रॉ.कॉ. व रिपाई महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते दणक्यात प्रचार करीत आहे.*
*महिलांनी केल्या घरोघरी आरत्या*
*चौकट*
भोकर येथील स्वामी समर्थ स्वाध्याय केंद्राच्या शेकडो महिलांनी गुलाबराव पाटील यांचे औक्षण करून स्वागत केले. तसेच परिसरातील गावांमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीने व ढोल ताशांच्या गजरात खास करून भोकर येथे घरोघरी गुलाबभाऊंचे औक्षण व आरत्या करण्यात आल्या. जणू काही आजच भाऊबीज आहे असे भावनिक वातावरण दिसून आले.
प्रत्येक गावात काढलेल्या भव्य रॅलीत भाजपचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. जळकेकर महाराज, सेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, यावेळी रॉ.कॉ. चे जिल्हाध्यक्ष संजय पवार, जि.प. चे उपाध्यक्ष लालचंद पाटील, रिपाई चे अनिल अडकमोल, पं. स. सभापती जना आप्पा कोळी, राजेंद्र चव्हाण, डॉ. कमलाकर पाटील, शिवाजी पाटील, गजानन सोनवणे, या परिसरातील सरपंच मंगलाबाई सोनवणे, किशोर पाटील, संदीप पवार, समाधान सपकाळे, जितु पाटील, ज्ञानेश्वर सपकाळे, दत्तू सोनवणे, दत्तुभाऊ सोनवणे, बलाशेथ राठी, प्रमोद सोनवणे, राजू लाधी, विजय पाटील, आण्णा सपकाळे, भाजपाचे तालुका प्रमुख हर्शल चौधरी, प्रभाकर पवार (मोठे भाऊ ), शालिक पाटील, लीलाधर पाटील, ज्ञानेश्वर पवार, अरविंद सपकाळे, सेनेचे शिवराज पाटील, अनिल भोळे, मुरलीधर अण्णा, दिलीप जगताप, बळीराम पाटील, गोपाल बडगुजर, सुभाष बडगुजर, भूषण बाविस्कर, सचिन पवार, गोपाल जिभाऊ, पांडुरंग जिभाऊ यांच्यासह व परिसरातील महायुतीचे सरपंच, पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.