राष्ट्रवादीच्या मिटकरींची गुलाबराव पाटलांवर टिका- नगराध्यक्ष निवडणूकीसाठी मतदान
धरणगाव – राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. स्थानिक स्तरावर देखील महाविकास आघाडीचा प्रयोग केला जात आहे. मात्र धरणगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी आमने सामने आहे. त्यामुळे राज्यात जरी शिवसेना-राष्ट्रवादीची मैत्री असेल मात्र धरणगावात दोन्ही मित्र एकमेकाविरोधात उभे ठाकले आहे. वीस वर्ष सत्तेत राहूनही ज्यांना धरणगाव शहराला मुलभूत सुविधा देता आल्या नाहीत. धरणगाव शहरावर शिवसेनेची इडा पिडा असुन शहराच्या विकासासाठी बळीरूपी राष्ट्रवादीची सत्ता आणा असे आवाहन करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आज शिवसेनेसह माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान धरणगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी दि. 29 रोजी मतदान होणार आहे.