धरणगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील साखरे गावातील स्वप्निल पाटील यांची पोलीस उप निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी स्वप्निल यांना श्रीफळ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्यात.
परिस्थितीची जाणीव करून लक्ष निर्धारित करत त्याला प्राप्त करण्यासाठी मेहनतीने केलेले प्रयत्न हे एकेदिवशी यशोशिखरावर पोहचवल्याशिवाय राहत नाही. साकरे गावच्या स्वप्नील दिनकर पाटील यांनी सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.
यामध्ये स्वप्निल पाटील यांचे पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. स्वप्निल यांनी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करताना प्रयत्नांमधील सातत्य आणि मेहनतीने हे यश मिळाल्याबद्दल जि प सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी स्वप्निल यांना श्रीफळ देवून शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच शरद पाटील, सुधाकर पाटील, गोकुळ पाटील, उदयभान पाटील, किशोर पाटील, मंगेश पाटील आदी गावातील नागरिक उपस्थित होते.