रेस्क्यू करतांना कोब्राने सर्पमित्राला दंश केल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.गोंदियाच्या फुलचुर येथील सुनील नागपुरे असे या सर्पमित्राचे नाव आहे.या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.
सर्पमित्र असलेले सुनील हे नेहमी प्रमाणे सापाला रेस्क्यू करण्यासाठी एकाच्या घरी पोहचले… कोब्रा जातीच्या सापाला सर्प मित्राने रेस्क्यू देखील केले मात्र सापाला पिशवीत भरत असतांना सुनील यांना कोब्राने दंश केला व त्यानंतर काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान सुनील या कोब्राला रेस्क्यू करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर समोर आला आहे.
माहितीनुसार सुनील यांनी एका घरात कोब्रा रेस्क्यू केला त्यानंतर या सापाला ते गोणीमध्ये भरत असताना सापाने त्यांना दंश केला. त्यानंतरही कसेतरी त्यांनी तो साप गोणीत भरले. नंतर त्रास होऊ लागल्यावर सुनील यांना तात्काळ गोंदिया शहरातील केटीएस रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
गोणीत भरताना कोब्रा फिरला आणि खेळ खल्लास, सर्पमित्राचा मृत्यू कॅमेरात कैद, पाहा Video pic.twitter.com/yjgKtyvUJW
— News18Lokmat (@News18lokmat) August 6, 2024