जळगाव,(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाने संधी दिल्यास जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढेल आणि संधीच सोनं करेल अशी प्रतिक्रिया भाजपाचे रोहित निकम यांनी आज दिनांक ७ रोजी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना दिली आहे. दरम्यान जळगाव शहराच्या विकासाच्या व्हिजन माझ्याकडे असून त्याची ब्ल्यू प्रिंट देखील तयार आहे, पक्षाने संधी दिल्यास संधीचं सोनं करेल असं सांगितलं.दरम्यान विद्यमान आमदार सुरेश दामू भोळे (राजुमामा) या मतदारसंघातून दोन वेळा निवडून येत प्रतिनिधित्व करीत आहे.
काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका असल्याने राजकीय पक्षांसह इच्छुकांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत दरम्यान जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर विधानसभा मतदार संघाकरिता भाजपातून इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांना आज एका पत्रकार परिषदेत भाजपाचे रोहित निकम यांना जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढणार का याबाबत विचारलं असता त्यांनी पक्षाने संधी दिल्यास सोनं करू असं म्हणत इच्छुक असल्याचे स्पष्ट केलं. जळगाव जिल्ह्यात मंत्री गिरीष महाजन यांचे राजकीय वर्चस्व कायम असल्याने जळगाव जिल्ह्यातील वातावरण भाजपाला पोषक असल्याचे बोललं जातं आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात यश मिळालं नसलं तरी मंत्री गिरीष महाजन यांनी जिल्ह्यात आपला करिष्मा कायम ठेवत जिल्ह्यातील दोन्ही जागावर भाजपाने विजय मिळवला आहे. दरम्यान गेल्या वार्षभरापासून आगामी विधानसभा निवडणुकीकरिता जळगाव शहर विधानसभा करिता भाजपातून इच्छुकांची अनेक नावं चर्चेत आल्याने राजकीय वातावरण तापले आहे.