बेंगळुरू- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कुठेही डिटेंशन सेंटर नाहीत असे वक्तव्य करून काही दिवस उलटत नाहीत तोच, कर्नाटक सरकारने पूर्वीच डिटेंशन सेंटर उभारलव्याचे उघड झाले आहे. बेकायदेशीर घुसखोरांसाठी बेंगळुरूपासून ४० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या नेलमंगलाजवळ हे सेंटर उभारण्यात आले आहे.
देशात कुठेही डिटेंशन सेंटर नसल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर सभेला संबोधित करताना सांगितले होते. मात्र, आम्ही कर्नाटकात घुसखोराना ठेवण्यासाठी डिटेंशन सेंटर उभारले असून घुसखोरांना ठेवण्यासाठी ते पूर्णपणे तयार असल्याची माहिती कर्नाटक सरकारच्या सामाजकल्याण खात्याचे आयुक्त आर. एस पेड्डप्पैया यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. कर्नाटक सरकारमधील गृहविभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.