जळगाव – अमळनेर तालुक्यातील बोरी, पांझरा व तापी या तीन नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी येत आहे. त्यानुसार महसूल विभागाकडून अवैध गौणखनिज वाहतूकीवर आळा बसविण्याच्या उद्देशाने कार्यवाही सुरु आहे.
अमळनेर तालुक्यातील हिंगोणे खुर्द प्र.अ,, फाफोरेखुर्द, फाफोरे बु. फाफोरे बु.1, बिलखेडे, कन्हेरे, खोकरपाट, बहादरवाडी, आमोदे, रंजाणे, जळोद, सावखेडा, मठगव्हाण, नालखेडा, दोधवद, हिेंगोणेसीम प्र.अ, मुंगसे, रुंधाटी, गंगापुरी, खापरखेडा, सात्री, डांगरी, बोहरे, कलाली, निम, शहापूर, तांदळी, ब्राम्हणे, भिलाली, बोदर्डे, कळंब, मुडी, मांडळ या गावातील बोरी, पांझरा व तापी या तीन नदी पात्रातून वाहनाने वाळू चोरी जाऊ नये, तसेच वाळू चोरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. यासाठी या गावांमधील बोरी, पांझरा व तापी या तीन नदीच्या पात्रात वाहनांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
अमळनेर तालुक्यातील बोरी, पांझरा व तापी या तीन नदीपात्रातून अवैधपणे वाळू उपसा करणाऱ्यांकडून कायद्याचे उल्लंघन होत असल्याने व पर्यायाने त्या संबंधितांवर कायदेशिर कारवाई केल्यानंतर त्यांच्याकडून अराजकता माजविण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अमळनेर तालुक्यातील बोरी, पांझरा व तापी या तीन नदी परिसरातील गावांसाठी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 आणि अन्य सर्व प्राप्त अधिकारानुसार 20 फेब्रुवारी, 2020 पर्यंत उपविभागीय दंडाधिकारी, अमळनेर भाग, अमळनेर यांनी वाहनांना नदीपात्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध केला आहे.
तरी नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी, अमळनेर भाग, अमळनेर श्रीमती सीमा आहिरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.