हैदराबाद- हैदराबादेतील महिला डॉक्टर दिशा हिच्यावर बलात्कार करून तिला जाळून मारणारे नराधम किती विकृत होते, याची धक्कादायक माहिती पुढं आली आहे. या नराधमांनी दिशाच्या आधी नऊ महिलांवर अत्याचार करून त्यांना जाळून मारलं होतं. खुदद् पोलिसांनीच ही माहिती दिली आहे.
२७ नोव्हेंबर रोजी चौघा नराधमांनी डॉक्टर दिशा हिच्यावर अत्याचार करून तिला जाळून मारलं होतं. या प्रकरणी मोहम्मद आरिफ, जे. नवीन, जे. शिवा आणि चेनाकेशवुलू यांना अटक करण्यात आली होती. चौकशीसाठी घटनास्थळावर नेले असता या नराधमांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, त्याआधी पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली होती. त्यावेळी त्यांनी ही कबुली दिली होती.
दिली. ‘दिशाच्या हत्येच्या प्रकरणात त्या चौघांना अटक केल्यानंतर आम्ही कर्नाटक व तेलंगण हायवेवर झालेल्या बलात्कार व हत्येच्या १५ घटनांसदर्भात त्यांची चौकशी सुरू केली. चौघांपैकी आरिफ आणि चेन्नाकेशवुलू यानी नऊ बलात्कार व हत्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली. तेलंगणातील संगारेड्डी, रंगारेड्डी व मेहबूबनगर तसंच, कर्नाटकच्या सीमावर्ती भागांत त्यांनी हे गुन्हे केले होते. त्यांच्या अत्याचाराला बळी पडलेल्यांमध्ये वेश्या आणि तृतीयपंथीयांचाही समावेश होता. या सर्व प्रकरणांची आम्ही सखोल चौकशी करत आहोत. त्यासाठी पोलीस पथकं घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत,’ असंही त्या अधिकाऱ्यानं सांगितलं.