जळगाव,(प्रतिनिधी)- राजपूत भामटा जातीच्या(Rajput Bhamta Caste ) नावातील ‘भामटा’ शब्द वगळण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली होती मात्र परंतु सरकारने या प्रकरणावरून सपशेल माघार घेतली आहे दरम्यान जळगाव शहराचे आमदार सुरेश(राजुमामा)दामू भोळे यांनी आज दिनांक १५ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात राजपूत भामटा जातीच्या (Rajput Bhamta Caste ) नावातील ‘भामटा’ शब्द वगळण्याची मागणी केली आहे.
- ‘राजपूत भामटा’ या (Rajput Bhamta Caste ) जातीतील ‘भामटा’ हा शब्द वगळण्यात येणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील सभेत केली होती. परंतु (Rajput Bhamta Caste ) या जातीच्या नावातून ‘Bhamta’शब्द हटवण्यात आल्यास या समाजाचा व्हीजेएनटी (VJNT) कॅटेगरीतील आरक्षणात समावेश होणार होता. परिणामी बंजारा, लमान, कैकाडी, मानस जोगी, माकडवाले, नंदीबैलवाले, अस्वलवाले आणि छप्पर बंद या समाजाचं आरक्षण धोक्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला होता. या संदर्भात बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेच्या गेल्या पावसाळी अधिवेशनात स्पष्टीकरण देत राजपूत भामटा जातीतील भामटा शब्द हटवण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलं होतं
आता पुन्हा सत्ता पक्षातील भाजपाचे आमदार सुरेश(राजुमामा)दामू भोळे यांनी राजपूत भामटा जातीच्या (Rajput Bhamta Caste ) नावातील ‘भामटा’ शब्द वगळण्याची मागणी केल्याने पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे.आमदार सुरेश(राजुमामा)दामू भोळे यांनी केलेल्या मागणीने राजपूत समाजामधून समाधानाच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.सत्ताधारी पक्षाच्याचं आमदारांनी मागणी केल्यामुळे सरकार राजपूत भामटा जातीच्या नावातील ‘भामटा’ शब्द वगळून राजपूत समाजाची मागणी पुर्ण करते का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.