मुंबई । सरकारी तेल कंपन्यांनी ऑगस्टच्या पहिल्या तारखेला खूप चांगली बातमी दिली आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे.
ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी 19 किलो एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांनी कपात केली आहे. या किमती आजपासून म्हणजेच 1 ऑगस्ट 2023 पासून लागू झाल्या आहेत. मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती जैसे थेच आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने त्यांच्या वेबसाइटवर नवीन दर अपडेट केले आहेत.
1 ऑगस्ट रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची मोठी कपात करण्यात आली आहे. या बदलामुळे नवी दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 1680 रुपयांवर गेली आहे. यापूर्वी 4 जुलै रोजी वाढीसह व्यावसायिक गॅस सिलिंडर 1780 रुपयांचा झाला होता.
इतर महानगरांबद्दल बोलायचे झाले तर, 1895.50 रुपयांऐवजी कोलकात्यात व्यावसायिक सिलिंडर आता 1802.50 रुपयांना मिळणार आहे. यानंतर मुंबईत 1733.50 रुपयांऐवजी आता 19 किलोचा गॅस सिलिंडर 1640.50 रुपयांचा झाला आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये 1945 रुपयांना मिळणारा सिलिंडर आता 92.50 रुपयांच्या कपातीसह 1852.50 रुपयांना मिळणार आहे. कोलकाता आणि मुंबईत गॅस सिलिंडरच्या दरात 93 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.