बलरामपूर : पतीने पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडलं. यामुळे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काट काढला. पतीची हत्या करुन मृतदेह विहिरीत टाकला.ही धक्कादायक घटना झारखंडमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी पत्नीसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांना धक्काच बसला आहे.
नेमकी घटना काय?
मयत तरुण एका शाळेत शिपाई म्हणून काम करत होता. आरोपी पत्नीचे गावातील तरुणासोबत अनैतिक संबंध सुरु होते. रात्री महिला आपल्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत होते. यादरम्यान अचानक पती घरी आला आणि त्याने पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले. यामुळे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काट काढला. पतीची हत्या करुन मृतदेह विहिरीत टाकला.
हे सुद्धा वाचा..
सप्तश्रृंगीगड घाटात प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, जळगावातील अनेक प्रवाशांचा समावेश
RBI कारवाईचा भडका! आठवडाभरात 4 बँकांचे परवाने रद्द; ग्राहकांच्या पैशाचे काय होणार?
10वी पाससाठी केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी..! तब्बल 1558 जागांसाठी भरती
सकाळी गावकऱ्यांनी विहिरीत मृतदेह तरंगताना पाहिला. यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटवत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मयत गावातीलच रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांना महिलेच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली. पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराची कसून चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आली. पोलिसांनी दोघांना अटक केली. दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.