सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. राज्यातील सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेमार्फत विविध पदांवर भरती निघाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2023 24 जुलै 2023 (11:55 PM) आहे.
एकूण जागा: 309
1) सहकारी अधिकारी (श्रेणी-I) – कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/ विज्ञान/ विधी/ कृषी शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवीधर असणे आवश्यक आहे
2) सहकारी अधिकारी (श्रेणी-II) – कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/ विज्ञान/ विधी/ कृषी शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवीधर असणे आवश्यक आहे.
3) लेखापरीक्षण (श्रेणी-III) – ॲडव्हान्स अकाउंटन्सीसह B.Com असणे आवश्यक आहे.
4) वरिष्ठ लिपिक/सहाय्यक सहकारी अधिकारी – कला/ वाणिज्य/ विज्ञान/ विधी/ कृषी शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
5) उच्च श्रेणी लघुलेखन – 10वी उत्तीर्ण, लखुलेखन 120 श.प्र.मि., मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि
6) निम्न श्रेणी लघुलेखन – 10वी उत्तीर्ण, लखुलेखन 100 श.प्र.मि., मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि
7) लघुटंकलेखन – 10वी उत्तीर्ण, लखुलेखन 80 श.प्र.मि., मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट: 21 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक:₹900/-]

