नवी दिल्ली । मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक मदतीची कामे केली जात असून अशातच आता मोदी सरकारने शेतकऱ्यांना खूशखबर दिली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. याअंतर्गत केंद्रीय मंत्रिमंडळाने उसाच्या एमएसपीमध्ये वाढ केली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने पुढील हंगामासाठी उसाच्या रास्त आणि किफायतशीर भावात प्रति क्विंटल 10 ते 315 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे पण वाचा…
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील घेतले हे 25 मोठे निर्णय ; जाणून घ्या..
नाशिक गुप्तचर खात्याची मोठी कारवाई ; मुक्ताईनगरमध्ये वाहनासह लाखोंचा गुटख्या जप्त
VIDEO | मुलींच्या पीजी हॉस्टेलबाहेर तरुणाचं अश्लील कृत्य पाहून तुम्हीही संतापाल
सरकारच्या या घोषणेचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. ठाकूर म्हणाले, “कॅबिनेटने 2023-24 च्या साखर हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 315 रुपये या आतापर्यंतच्या सर्वोच्च रास्त आणि माफक भावाला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांचे अवलंबित- सोबतच 5 लाख कामगार साखर कारखान्यांमध्ये काम करणाऱ्यांना फायदा होईल.
यापूर्वीही दरात वाढ करण्यात आली होती
त्याच वेळी, सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पणन वर्ष 2022-23 साठी ऊस उत्पादकांना कारखान्यांकडून द्यावयाच्या किमान किंमतीत 15 ते 305 रुपये प्रति क्विंटल वाढ केली होती. सुमारे 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांचे अवलंबित तसेच साखर कारखानदार आणि संबंधित अनुषंगिक कामांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे 5 लाख कामगारांना फायदा होण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला.

