मुक्ताईनगर | मध्यप्रदेशमार्गे मुक्ताईनगर कडे आणल्या वाजणाऱ्या गुटखा वाहतूक करणारे वाहनवर कारवाई करण्यात आलीय. यात तब्बल १८ लाख रूपयांचा गुटखा आढळून आला असून गुटख्यासह वाहन जप्त करण्यात आले आहे. याबाबत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याबाबत असे कि, मध्यप्रदेशातून एमएच १९ बीएम २३८४ या क्रमांकाच्या महेंद्रा बोलेरो पीकअप वाहनातून अवैध गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याची तक्रार नाशिक येथील गुप्तचर खात्याकडे करण्यात आली होती.
हे पण वाचा…
VIDEO | मुलींच्या पीजी हॉस्टेलबाहेर तरुणाचं अश्लील कृत्य पाहून तुम्हीही संतापाल
टोमॅटोच्या किमतीने ओलांडला 100 रुपयाचा टप्पा ; सरकारने सांगितले दर कधी कमी होणार?
अरे बापरे। MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला
या अनुषंगाने चेक पोस्टवर सापळा रचून सदर वाहन थांबविण्यात आले. यात तपासणी केली असता १८ लाख रूपयांचा विमल या ब्रँडचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी गुटखा आणि वाहन मिळून एकूण २२ लाख रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
अलीकडच्या काही महिन्यांचा विचार केला असता, बर्याचदा या प्रकारे गुटख्यांची वाहतूक करणार्या वाहनांना जप्त करण्यात आले आहे.आजच्या कारवाईने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.