जळगाव : राज्यात मुलांच्या तस्करीची बातमी समोर येताच ती हव्यासारखी पसरली. बिहारहून महाराष्ट्रात रेल्वेने प्रवास करत 30 अल्पवयीन मुलांना मनमाडमध्ये तर 29 लहान मुलांना भुसावळ रेल्वे स्थानकावर सोडवण्यात आल्याचे वृत्त समोर आले. मात्र ही मानव तस्करीची नसून मदरशाच्या मौलानाला फसवण्याचे षडयंत्र रचलेले आहे असं एआयएमआयएमच्या माजी कार्यकारी जिल्हाध्यक्ष रयान जहागीरदार यांनी खुलासा केला आहे.
नेमका प्रकार काय?
बिहार राज्यातून पूर्णिया जिल्ह्यामधून महाराष्ट्रातील सांगली येथील मदरशामध्ये दानापूर-पुणे एक्स्प्रेस मधून तस्करी करून 59 मुलांची भुसावळ ते मनमाड स्थानकादरम्यान सुखरुप सुटका करण्यात आल्याच्या बातम्या झळकल्या. मुलांच्या तस्करी करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे देखील वृत्त समोर आले असून गुन्हा देखील दाखल करण्यात आले आहे.
हे पण वाचा..
विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार! दहावी परीक्षेचा निकाल उद्याच लागणार?
६ वर्षाच्या चिमुरडीला बाजूच्या खोलीत नेऊन केला बळजबरीने अत्याचार, नराधमाला अटकेत
Samsung चा येतोय सर्वात मजबूत बॅटरी असलेला फोन, 6 जूनला होणार लाँच
परंतु याबाबत एआयएमआयएमच्या माजी कार्यकारी जिल्हाध्यक्ष रयान जहागीरदार यांनी ही माहिती खोटी असल्याचं म्हटलं आहे. कोणत्यातरी माथे फिरू नये आरपीएफला खोटी माहिती देऊन गरीब मुलांना व मदरशाच्या मौलानाला फसवण्याचे षडयंत्र रचलेले असल्याचे ते म्हणाले. या घटनेचा त्यांनी जाहीर निषेध करत आरपीएफ ऑफिसरची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली.