भारतीय नौदलात नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. नौदलात 1365 पदांवर भरतीची जाहिरात निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे.
एकूण पदसंख्या : 1365 जागा (महिला: 273 जागा)
पदाचे नाव: अग्निवीर (SSR) 02/2023 बॅच
आवश्यक पात्रता: गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान)
वयाची अट: जन्म 01 नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 दरम्यान.
हे पण वाचा..
ISRO मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी! पदवीधरांसाठी 303 पदांवर भरती
नोकरी हवीय तेही जळगावात? येथे सुरूय बंपर भरती, 8वी पास ते पदवीधरांना संधी..
पंजाब नॅशनल बँकेत तब्बल पदांवर निघाली भरती ; मिळणार 70000 पेक्षा जास्त पगार
पात्रता फक्त 12वी पास अन् पगार 92000 पर्यंत ; SSC मार्फत 1600 पदांवर भरती
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अशी होईल निवड?
उमेदवारांची निवड दोन टप्प्यातील प्रक्रियेद्वारे केली जाईल, पहिल्या टप्प्यात संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा आणि दुसऱ्या टप्प्यात ‘लिखित परीक्षा, पीएफटी आणि भरती वैद्यकीय परीक्षा’. संगणक आधारित परीक्षेत प्रत्येकी 1 गुण असणारे एकूण 100 प्रश्न असतील.
अर्ज फी :
ऑनलाइन नोंदणीच्या वेळी उमेदवारांना 550 रुपये अधिक जीएसटी भरावा लागेल. अर्जदार अधिक तपशील आणि अर्ज फॉर्म लिंकसाठी भारतीय नौदल अग्निवीर भर्ती पोर्टलला भेट देऊ शकतात.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जून 2023