शेतकरी सध्या खरीप हंगामासाठी पूर्वतयारी करण्यात व्यस्त असून मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने मान्सून संदर्भातदुसरा अंदाज व्यक्त केला असून या अंदाजामुळे शेतकऱ्यांना थोडासा धक्का बसण्याची शक्यता आहे.
त्याच कारण म्हणजे जून महिन्यात संपूर्ण देशात मान्सून सरासरीपेक्षा कमी राहणार असं हवामान खात्याने वर्तवलेल्या या नवीन हवामान अंदाजात म्हटले आहे. मात्र जून ते सप्टेंबर या काळात 96% पाऊस पडणार असा आपला पूर्वीचा अंदाज हवामान विभागाने कायम ठेवला आहे.
हे पण वाचा,,
शरीर एकच, पण, दोन डोकं, दोन हात-पाय ; जळगावत शरीराने जुळलेल्या मुलींचा जन्म
उष्णतेपासून जळगावकरांना मिळणार दिलासा! जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस लावणार हजेरी
ग्राहकांना झटका! 1 जूनपासून Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर महागणार, पहा किती रुपयांची वाढ होणार..
मराठवाडा, विदर्भ जून महिन्यात कमी पाऊस तर संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक तापमानाची शक्यता आहे. दीर्घ काळासाठी म्हणजे जून-सप्टेंबर महिन्यात दिलेल्या अंदाजात महाराष्ट्रात मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
अल निनोसाठी अनुकूल वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे. मान्सूनमध्ये अल निनोचा प्रभाव बघायला मिळण्याची दाट शक्यता असल्याचे देखील भारतीय हवामान विभागाची म्हटले आहे. हवामान विभागाकडून (IMD) तिसरा अंदाज हा जुलै महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे.