अभिनेत्री दीपाली सय्यद पुन्हा चर्चेत आल्या असून यावेळी मात्र त्यांच्यावर झालेल्या खळबळजनक आरोपामुळे त्या चर्चेत आहेत.शिंदे गटात जाण्यासाठी इच्छुक असलेल्या महिला नेत्या तथा अभिनेत्री दीपाली गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत आहे. मात्र, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून दीपाली सय्यद यांचा माध्यमांशी संपर्क कमी झाल्याचा दिसून येतो दरम्यान आज दीपाली सैय्यद यांच्या माजी स्वीयसहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
पाकिस्तानी नागरिकत्व स्विकारल्याचा गंभीर आरोप
दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानी राष्ट्रीयत्व स्वीकारलं असून त्यांच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट आहे. पाकिस्तानमध्ये दीपाली सय्यद यांचं नाव सोफिया सय्यद आहे, असा खळबळजनक दावा त्यांचे स्वीय सहायक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. भाऊसाहेब शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली.यापूर्वीही शिंदे यांनी दीपाली सय्यद यांचे अंडरवर्ल्ड दाऊद गँगशी आर्थिक संबंध असल्याचा गौप्यस्फोट केला होता.
दीपाली सय्यद यांची लंडन, दुबई येथे संपत्ती
दीपाली सय्यद यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी आणि त्याच्या बायकोशी संबध आहेत. तसेच लंडन, दुबई येथे त्यांची मालमत्ता आहे, असा गंभीर आरोपही भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. तसेच, मी याबाबत शासनाला पुरावेही दिले आहेत, त्यांच्या बँकेचा तपशील दिला असून दीपाली यांच्याकडे बनावट पाकिस्तानी पासपोर्ट असल्याचेही त्यांनी म्हटले. मी प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी करत आहे, पण याची कोणीही दखल घेत नाही असा थेट आरोप त्यांनी यावेळी केला आहे.