केंद्र सरकारचे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिल्याने शिक्षक होण्यासाठी आता यापुढे १२वी नंतर चार वर्षांची पदवी अभ्यासक्र असलेला शिक्षणशास्त्र विषय समाविष्ट करून ‘बीएड’ करावे लागणार आहे. त्यामुळे जुनी शैक्षणिक पद्धत कालबाह्य झाली असून डीएड’ शिक्षण बंद करण्यात आले आहे.
केंद्र सरकारचे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिल्याने राज्यातील सर्व अकृषिक विद्यापीठांमध्ये जून २०२३-२४ नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.४ वर्ष असलेला पदवी अभ्यासक्रम पूर्ण करताना शेवटच्या सेमिस्टरवेळी विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात किमान ६ महिने ॲप्रेटायशेन, इंटरशिप करावी लागेल. त्यानंतर तो नोकरी किंवा व्यवसायात उतरू शकणार आहे .
दोन महिलाही एकत्र येऊन मूल जन्माला घालू शकतील ; पुढील १० वर्षांत गर्भाची गरजच नाही…
‘या’ विद्यार्थ्यांना नवे शैक्षणिक धोरण लागू नसेल सर्वात महत्वाचे म्हणजे 1२ वी नंतर नव्याने पदवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. सध्या शिकत असलेल्यांना नवे धोरण लागू असणार नाही.त्यामुळं शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी गोंधळून जायचे कारण नाही.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार काय झाले बदल…
1)तीन वर्षाची पदवी आता चार वर्षांची होणार आणि त्यानंतर थेट ‘पीएचडी’ करता येईल.
2)विषय निवडीसाठी विद्यार्थ्यांना स्वातंत्र असणार असून एखाद्या अभ्यासक्रमाचा विद्यार्थी दुसरा विषय घेऊ शकतो.
3)एका वर्षानंतर सर्टिफिकेट मिळेल, दोन वर्षानंतर डिप्लोमाचे प्रमाणपत्र तर तीन वर्षानंतर पदवी प्रमाणपत्र मिळणार.
4)चार वर्षे झाल्यावर डिग्रजी विथ ऑनर्स किंवा डिग्री विथ रिसर्च मिळणार; ‘रिसर्च’ घेतले तरच ‘पीएचडी’ करता येईल.
5)पाच वर्षे पूर्ण केल्यावर पदव्युत्तर पदवी मिळेल आणि गॅप पडला तरीदेखील दोन-तीन वर्षांनी प्रवेश घेता येतो.प
6) परीक्षेची सत्र पद्धती कायम असणार, पण ‘सीबीसीएस’ पॅटर्ननुसार टक्केवारी नव्हे ग्रेडेशन (स्कोअर क्रेडिट) पद्धती असणार.
‘पदवी’ पूर्ण करण्यासाठी ७ वर्षांची मुदत
सध्याच्या शैक्षणिक धोरणानुसार, तीन वर्षांची पदवी पूर्ण करण्यासाठी पाच वर्षांची कालमर्यादा ठरलेली आहे. पण, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ७ वर्षांचा काळ विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. दरम्यान, ‘पीजी’ केलेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षात बीएड करता येईल. तर पदवी घेतलेल्यांना दोन वर्षे तर बारावीनंतर बीएडसाठी चार वर्षे लागणार आहेत. नवीन धोरणात ‘डीएड’ नाही. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक होण्यासाठी ‘बीएड’च करावे लागणार आहे. पण, विषय निवडताना कोणता शिक्षक व्हायचा, त्यावरून विषय घेता येणार आहेत.
हे सुद्धा वाचा….
महिलांसाठी ही विशेष योजना 1 एप्रिल पासून झाली सुरु : नेमकी काय आणि कसा लाभ मिळेल?
खळबळजनक! तरुणीने बनवला आपल्याच मैत्रिणीचा बाथरूममधील आंघोळ करतानाचा व्हिडीओ, अन्…
भारतीय सैन्यात नोकरी मिळविण्याची उत्तम संधी..तब्ब्ल 81100 पगार मिळेल, येथे पाठवा फॉर्म?
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत बंपर भरती सुरु…
8वी, 10वी पाससाठी खुशखबर.. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगाव इथे मोठी भरती…
नोकरी मिळविण्याची संधी..! बुलडाणा अर्बन को ऑप सोसायटीमध्ये विविध पदांसाठी भरती…