मुंबई : आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा शॉक बसला आहे. आर्थिक तोटा भरुन काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) सह बेस्ट, अदानी आणि टाटा पावरच्या वीज दरात मोठी वाढ झाली आहे. घरघुती वीजेच्या दरात सहा टक्क्यांची वाढ झाली आहे.
या कंपन्यांनी केली दरवाढ?
MSEDCL च्या ग्राहकांना 2023-24 मध्ये सरासरी 2.9 टक्के तर 2024-25 साठी 5.6 टक्के दरवाढ केली आहे. घरगुती वीजेच्या दरात 2023-24 साठी सहा टक्के तर 2024-25 साठी सहा टक्के वाढ झाली आहे. तर बेस्टच्या ग्राहकांना 2023-24 साठी वीज दरात सुमारे 5.07 टक्के तर 2024-25 साठी 6.35 टक्के अधिक मोजावे लागणार आहेत.
हे पण वाचा..
अट्रावल येथे महापुरूषांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना, गावात तणावाचे वातावरण
आ. खडसेंनी केला स्व.गोपीनाथ मुंडेंबद्दल मोठा गौप्यस्फोट ; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
धक्कादायक ! मधमाशांचा बाप लेकावर हल्ला; मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांचा मृत्यू
अत्यंत महत्वाची बातमी! आजपासून मोदी सरकारने केले देशात हे 20 मोठे बदल, काय आहेत घ्या जाणून
टाटा पावरच्या ग्राहकांना सरासरी 2023-24 साठी 11.9 टक्के वाढ झाली आहे. तर 2024-25 साठी 12.2 टक्के वाढ झाली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या ग्राहकांना 2023-24 साठी सरासरी 2.2 टक्के तर 2023-24 साठी २.१ टक्के अधिक मोजावे लागणार आहेत.
दरम्यान, सध्या राज्यात उन्हाळा चांगलाच वाढला आहे. तापमानाचा पारा वाढल्यानं वीजेच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. त्यास्थितीत महावितरणच्या कराराअंतर्गत विजेने कमाल मर्यादा गाठली आहे. परिणामी राज्य सरकारी कंपनीला किमान दोन हजार मेगावॉट वीज बाहेरून खरेदी करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळं विजेच्या दरात वाढ करण्यात आली आहे.