नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. आज बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात संमिश्र कल दिसून आला. मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत आज सोन्याच्या किमतीत घसरण झाली. दुसरीकडे सराफा बाजारात दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण दिसून आली. ऑगस्ट 2020 मध्ये 56,200 रुपयांचा विक्रम करणाऱ्या सोन्याने मागील काही दिवसांत 60,000 रुपयांची पातळी ओलांडली होती. तसेच 71,000 रुपयांचा विक्रम केल्यानंतर चांदीच्या दरातही घट झाली आहे.
सोने आणि चांदी दोन्हीमध्ये चढ-उतार
दिवाळीच्या काळात सोने-चांदीचे भाव आणखी वाढतील, अशी आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सोन्याचा भाव 65,000 रुपये आणि चांदीचा भाव 80,000 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या सोन्या-चांदीचे भाव विक्रमी पातळीवर आहेत. जागतिक बाजारातील मंदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दोन्ही दरात चढ-उतारांचा काळ आहे.
MCX वर सोन्या-चांदीत घसरण
बुधवारी मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदी या दोन्ही भावात घसरण दिसून आली. गेल्या काही दिवसांत ५८,००० रुपयांच्या पुढे गेलेले सोने बुधवारी २६१ रुपयांच्या घसरणीसह ५९४७३ रुपये प्रति १० ग्रॅमवर ट्रेंड करत आहे. गेल्या काही दिवसांत चांदीने 71,000 चा टप्पा पार केला होता. बुधवारी तो 198 रुपयांनी घसरला आणि 70,386 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होता. याआधी मंगळवारी सोन्याचा भाव 59734 रुपये आणि चांदी 70584 रुपये किलोवर बंद झाला होता.
हे सुद्धा वाचा..
धावत्या दुचाकीवर चिमुकल्यासमोर बायकोचा असाही प्रताप ; VIDEO पाहून तुम्हीही संतापाल
सारस्वत बँकेत नोकरी मिळविण्याची उत्तम संधी.. पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी
अंमलबजावणी संचालनालय अंतर्गत बंपर भरती ; तब्ब्ल 81 हजार पगार, असा करा अर्ज
ISRO मध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी..! मिळणार 56000 रुपये प्रति महिना पगार
सराफा बाजारात सोने-चांदीचे भाव वधारले
बुधवारी सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. इंडिया बुलियन्स असोसिएशनने (https://ibjarates.com) जाहीर केलेल्या किमतीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 141 रुपयांनी वाढून 59106 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचवेळी चांदीच्या दरात 120 रुपयांची वाढ होऊन तो 69620 रुपये किलोवर पोहोचला.