पाचोरा(वार्ताहर) दि,२८ – पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची व आर्थिक नाडी सांभाळणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीची सन २०२३ ते २०२८ साठीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सदर निवडणुकी मध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने कार्यसम्राट आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या नेतृत्वात बाजार समितीसाठी विविध जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बुधवार दि.२९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता ‘ शिवालय’ आमदार किशोर अप्पा पाटील यांचे निवास तथा संपर्क कार्यालय,पाचोरा या ठिकाणी आयोजित केल्या आहेत तरी इच्छुकांनी मुलाखतीसाठी वेळेत हजर राहावे असे आवाहन जिल्हा प्रमुख रावसाहेब मनोहर गिरधर पाटील,उपजिल्हा प्रमुख,गणेश भ पाटील ,डॉ विशाल पाटील
तालुका प्रमुख सुनिल पाटील ,पाचोरा , संजय पाटील,(भुरा अप्पा) भडगाव,शहर प्रमुख,किशोर बारावकर,पाचोरा,बंडू चौधरी, शहर प्रमुख ,आबा चौधरी,योगेश गंजे, शहर प्रमुख भडगाव यांनी केले आहे.