चोपडा,(प्रतिनिधी)– जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील मितावली येथे लहान भावाने आपल्या मोठ्या सख्ख्या भावावर विळ्याने वार करून जीवे ठार मारल्याची धक्कादायक घटना दिनांक २५ मार्च रोजी घडली आहे, घटनेनं परिसरात खळबळ उडाली.
शेतीच्या कामासाठी घरून सोबत गेले पण…
चोपडा तालुक्यातील मितावली येथे संदीप प्रताप पाटील आणि सतीश प्रताप पाटील हे दोन भाऊ वास्तव्याला होते. हे दोन्ही जण आपलील वडिलोपार्जीत शेती करून उदरनिर्वाह करत असत. दरम्यान, आज हे दोन्ही भाऊ आपल्या पारगाव शिवारात काम करण्यासाठी सोबत गेले होते दरम्यान दोघं भावांमध्ये जोरदार वाद झाल्याची माहिती मिळतं आहे.
रेल्वेत जोगवा मागणारी भुसावळची तृतीयपंथी चाँद पोलीस भरतीत अव्वल
या वादात सतीश याने आपला सख्खा मोठा भाऊ संदीप याच्यावर विळ्याने वार केले. यात संदीप प्रताप पाटील ( वय ३६ ) यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, थोड्या वेळाने याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर वार्यासारखी ही बातमी पसरल्याने ग्रामस्थही घटनास्थळी दाखल झाले. विभागीय पोलीस अधिकारी ऋषीकेश रावले, एपीआय गणेश बुवा पी.एस.आय.चंद्रकात पाटील यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरू केला.
या दोन्ही भावांमध्ये नेमका कशावरून वाद झाला याची माहिती समजली नाही. या प्रकरणी सतीश पाटील याला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी १८ तासात पकडण्यात पोलिसांना यश
Sarkari Yojna; वैयक्तिक शेततळे योजनेसंदर्भात मोठी अपडेट तर एका कृषी योजनेचा दुसरा टप्पा होतोय सुरु!
अत्यंत महत्वाची बातमी! १ एप्रिलपासून बदलणार अनेक नियम, थेट तुमच्यावर होणार परिणाम