जळगांव, (प्रतिनिधी)- दिनांक 16 मार्च 2023 रोजी इंडियन रेडक्रॉस सोसायटी समोरील बौद्ध वसाहत येथील तथागत गौतम बुद्ध व विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बेकायदेशीर रित्या प्रशांत शरद देशपांडे व अमित एकनाथ पाटील यांच्या सह इतर समाज कंटक यांनी 16 मार्च रोजी हटविले होते. त्यानुसार प्रशांत शरद देशपांडे व अमित एकनाथ पाटील यांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊन आठवडा उलटून गेला आहे. परंतु अद्यापपर्यंत या घटनेतील आरोपींना अटक करण्यात येत नाही. विशेषतः विधानपरिषद सभापती नीलम ताई गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत सांगितले की, या गुन्हा तील आरोपींना 24 तासांच्या आत अटक करा तरी आरोपींना अटक होत नाही.
या अनुषंगाने तथागत गौतम बुद्ध व विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा संरक्षण समिती च्या शिष्टमंडळाने आज दिनांक 24 मार्च 2023 रोजी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची भेट घेऊन पोलीस प्रशासनाने या गुन्हा तील आरोपींना कुठलीही दया न दाखवता आरोपींना तात्काळ अटक करावी व जळगाव जिल्ह्यातील पोलीस प्रशासन निरपेक्ष व जलद कारवाई करणारे आहेत हे दाखवून द्यावे. आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला.
यावेळी अँड.राजेशभाऊ झाल्टे , मुकुंद भाऊ सपकाळे, विजय निकम, सचिन धांडे, नगरसेवक सुरेश सोनवणे, मिलिद सोनवणे, सतीश गायकवाड, शाम तायडे , प्रमोद इंगळे, दिलीप अहिरे, हरिश्चंद्र सोनवणे, विजय सुरवाडे, अशोक सोनवणे, सुजाता ठाकूर, अशोक कोल्हे, पिंटू सपकाळे, दिलीप सपकाळे,वाल्मिक सपकाळे, जितेंद्र केदार, समाधान सोनवणे, दिलीप अहिरे, आनंद सोनवणे, भिका भालेराव, राजू भालेराव , रवींद्र सपकाळे, उपस्थित होते.