फैजपूर : पत्त्याच्या क्लबवर कोणतीही कारवाई न करता क्लब सुरळीत सुरु राहण्यासाठी चार हजार रुपयांची मागणी केली होती. ती स्वीकारताना फैजपुर पोलीस स्टेशनचे बामणोद बीटचे सुप्रिमो असलेले सहायक फौजदारासह दोन पोलीस नाईक जाळ्यात अडकले आहे. तीन्ही संशयित आरोपीविरुद्ध फैजपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
या घटनेतील तक्रारदाराचा यावल तालुक्यातील बामणोद येथे पत्त्याचा क्लब आहे. हा क्लब सुरळीत सुरु राहण्यासाठी फैजपुर पोलीस स्टेशनचे बामणोद बीटचे सुप्रिमो असलेले सहायक फौजदार हेमंत वसंत सांगळे आणि त्यांचे सहकारी पोलिस नाईक किरण अनिल चाटे या दोघांनी तक्रारदाराकडे एकुण चार हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने एसीबी कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार दिली होती. ठरल्यानुसार पत्त्याचा क्लब चालक तक्रारदार हे सहायक फौजदार हेमंत सांगळे आणि पोलिस नाईक किरण चाटे या दोघांची भेट घेण्यासाठी फैजपूर पोलिस स्टेशनला गेले होते.
सहायक फौजदार हेमंत सांगळे यांनी तक्रारदाराकडे कामाची व पैशाची बोलणी केली. त्यानंतर त्यांनी पोलिस नाईक किरण चाटे यांना फोन लावून किती पैसे घ्यायचे याबाबत बोलणी केली आणि तक्रारदाराकडे फोन देवून आपसात बोलणे देखील करुन दिले. तडजोडीअंती चार हजार रुपये लाचेची रक्कम सहायक फौजदार हेमंत सांगळे यांच्याकडे देण्यास चाटे यांनी तक्रारदाराला सांगितले. त्या चार हजार रुपयांची विभागणी देखील उघड करण्यात आली. सहायक फौजदार आणि पोलिस नाईक यांचे मिळून तिन हजार आणि गोपनीय शाखेतील पोलिस नाईक महेश वंजारी याचे एक हजार असे एकुण चार हजार रुपये देण्याघेण्याचे ठरले.लाचेची चार हजार रुपयांची रक्कम सहायक फौजदार हेमंत
सापळा पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलिस उप अधिक्ष शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एस. के. बच्छाव, एन. एन. जाधव, स.फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ. सुनिल पाटील, पो.हे.कॉ. रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना. ईश्वर धनगर, पो.ना. जनार्दन चौधरी, पो.ना. किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ. सचिन चाटे, पो.कॉ. अमोल सुर्यवंशी, पो.कॉ. प्रणेश ठाकुर. पो. कॉ. राकेश दुसाने आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.
.