मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गट आणि ठाकरे गट असा संघर्ष पाहायला मिळत आहे. यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने शिंदे गटावर निशाणा साधत आहे. अशातच आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना मोठा धक्का दिला आहे.
राऊत यांची शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संसदीय नेतेपदी खासदार गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून माहिती दिली आहे.
राऊतांना पदावरुन हटवून एकनाथ शिंदेंनी मोठा धक्का दिला आहे. यांसंदर्भात काही दिवसांपूर्वीच खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकारांना तशी माहितीही दिली होती. त्यानुसार, आज ही निवड करण्यात आली आहे.
हे पण वाचा..
1 लिटर डिझेलमध्ये ट्रेन किती किलोमीटर धावते? वाचून व्हाल हैराण
Big Breaking! सुरत न्यायालयाने राहुल गांधींना सुनावली 2 वर्षांची शिक्षा
घसरणीनंतर सोने पुन्हा महागले! घेतली जबरदस्त उडी; ‘हा’ आहे आजचा नवीनतम दर
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर..! एसी कोचमध्ये प्रवास करणे झाले स्वस्त
दरम्यान, मागील काही दिवसापूर्वीच शिवसेना नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता. गजानन किर्तीकर यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर रविंद्र नाट्य मंदिर येथील एका कार्यक्रमात गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता.