मुंबई : आर्थिक वर्ष 2022 2023 संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. या काळात वर्षभरात झालेल्या सर्व खर्चाची गणना किंवा गणना करतो. सर्व खाती मार्च महिन्यातच जमा होतात, मग ती बंद केली जातात. अशा परिस्थितीत रिझर्व बँकेने बँकांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
३१ मार्च २०२३ पर्यंत बँका दररोज सुरू ठेवा, असे आदेश रिझर्व बँकेने देशातील सर्व बँकांच्या शाखांना दिले आहेत. त्यामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसांत बँका (Bank) रविवारी सुद्धा सुरू राहणार आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ या महिन्याच्या ३१ तारखेला संपणार आहे. काही महत्वाची कामे बाकी असल्याने ती झटपट आटोपण्यासाठी रिझर्व बँकेने हे आदेश दिले असल्याची माहिती आहे.
आरबीआयने (RBI) यासंदर्भातील परिपत्रक देखील काढले असून त्यात बँकांना काही सूचना करण्यात आल्या असून विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे. आरबीआयने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, “सरकारशी संबंधित काउंटर व्यवहारांसाठी सर्व एजन्सी बँकांना त्यांच्या शाखा ३१ मार्च रोजी सामान्य कामकाजाच्या तासांपर्यंत खुल्या ठेवाव्या लागतील”.
“नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजेच NEFT आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट म्हणजेच RTGS प्रणालीद्वारे होणाऱ्या व्यवहारासाठी बँका ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत सुरू राहतील. या काळात सरकारी चेक जमा करण्यासाठी विशेष क्लिअरिंग घेण्यात येईल”.
त्याकरीता डिपार्टमेंट ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम म्हणजेच DPSS आवश्यक निर्देश जारी करेल. DPSS हे आरबीआयच्या अंतर्गत येते. आरबीआयच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. कारण, त्यांच्या ताटकळत पडलेली कामे ३१ मार्चच्या आत पूर्ण होईल.