राजपूत ‘भामटा’ या जातीतील ‘भामटा’हा शब्द शिवीसारखा असल्याने त्या ऐवजी राजपूत अ, ब, क असे संबोधन करावे,तसेच राजपुत समाजासाठी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी आग्रही मागणीआमदार श्वेता महाले पाटील यांनी विधानसभेत सामाजिक न्याय विभागाच्या मागण्यांवर चर्चेदरम्यान केली आहे.
हिंदूसूर्य महाराणा प्रताप ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहास असून हा समाज लढावय्या, वीर समाज म्हणून ओळखला जातो, अलौकिक वारसा लाभलेला राजपूत हा समाज मुळातच लढवय्या आहे.राजे-महाराजांच्या काळात या समाजातील सैनिक कट्टर लढवय्ये म्हणून ओळखले जात. मोघल, निजाम यांच्या विरुद्ध लढणारा समाज म्हणजे राजपूत समाज होय, स्वातंत्र्यांच्या काळात सुद्धा इंग्रजांच्या विरुद्ध राजपूत समाज लढला आहे.
राजपूत समाजाने गनिमी काव्याने इंग्रजांना सळो की पळो करून ठेवले होते असा इतिहास आहे.ब्रिटिश राज्य सत्तेच्या विरुद्ध या समाजाने लढा दिल्याने ब्रिटिश राजवटीने या समाजाविरुद्ध लूट पाट, खून, दरोडे,असे कलमे लावून त्यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करून त्यांना राजपूत ऐवजी भामटा राजपूत असे लेखी पुरावे तयार करून या लढावय्या जातीला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे.तरि राजपूत शब्दाच्या आधी लावण्यात येणारा भामटा शब्द हा शिवीसारखा वाटतो अशी सखोल माहिती आमदार श्वेता महाले पाटील यांनी सभागृहात देऊन त्या ऐवजी राजपूत अ, ब, क असे संबोधन करावे अशी मागणी केली आहे.
समाजातील युवा पिढी उच्चशिक्षित….
राजवटींचा काळ संपल्यानंतर या समाजाने शेती व्यवसायासह अन्य व्यवसाय करण्यास प्रारंभ केला. काळानुरुप शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेतल्याने या समाजातील युवा पिढी उच्चशिक्षित झाली. राजकारणाबरोबरच प्रशासन सेवेत उच्च पदावर या समाजातील अनेक व्यक्ती आज कार्यरत आहेत. समाजातील अनेक जुन्या चालीरिती झुगारून हा समाज शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीच्या वाटेवर वाटचाल करताना दिसत आहे.