जळगाव,(प्रतिनिधी)- ट्रक थांबवून लुटमार करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात असून याप्रकरणी चोपडा शहर पो.स्टे. CCTNS NO १३४ / २०२३ भादवि कलम ३९५, ३२३, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. यातील आरोपीना लवकरात लवकर अटक करण्याचे पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली.
पोलीस अधीक्षक एम. राज कुमार , चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, ऋषीकेश रावले, सहाय्यक पोलीस अधीक्षक, चोपडा भाग व किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव व के.के.पाटील, पोलीस निरीक्षक, चोपडा शहर पो.स्टे. यांचे मार्गदर्शनाखाली पोह विजयसिंग पाटील, पोह अकरम शेख, पोह महेश महाजन, पोना परेश महाजन, रविंद्र पाटील, अविनाश देवरे, दिपक शिंदे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव तसेच सपोनि संतोष चव्हाण, पोउपनिरी श्री घनश्याम तांबे, पोह दिपक विसावे, शेषराव तोरे, पोना प्रमोद पाटील, संतोष पारधी, प्रमोद पवार सर्व नेमणुक चोपडा शहर पो.स्टे. यांनी
गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे मोठ्या शिताफीने गेंदालाल मिल जळगाव येथून आरोपी १) नवाबखान गुलाबखान वय ३२, रा. शिवाजी नगर जळगाव, २) शहारुख खान शाबीर खान, वय ३०, रा. गेंदालाल मिल जळगाव, ३) सौरभ भुवनेश्वर लांजेवार, वय २५, रा. रायपुर छत्तीसगड, ४) जावेद खान नासीरखान, वय ३२, रा. गेंदलाल मिल जळगाव, ५) प्रदिप राध्योश्याम रायपुरीया, वय ३४, रा. गेंदलाल मिल जळगाव मुळ राहणार सेआमपुरा, ता. लाहार जि. भिंड मध्य प्रदेश यांना चोपडा शहर पो.स्टे. CCTNS NO १३४ / २०२३ भादवि कलम ३९५, ३२३, ५०६ या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले आहे.