जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्हा नाकाबंदी दरम्यान पोलीस दलाने धडक कारवाई कारवाईचे सत्र दिनांक २० व २१ मार्च दरम्यान सदर नाकाबंदी कामी जळगाव जिल्हयांतील चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव यांचेसह ४८ पोलीस अधिकारी १८३ पोलीस अंमलदार नेमण्यात आले होते.
याबाबत सविस्तर असे की, पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, यांनी दि. २० मार्च २०२३ रोजी २३.०० ते दि. २१ मार्च २०२३ चे सकाळी ०५.०० वा. पावेतो आमावस्या असल्याने जळगाव जिल्हयात प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत अचानक नाकाबंदी, राबविली. पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी दिलेल्या सुचना प्रमाणे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दि.२० मार्च २०२३ रोजी संपूर्ण रात्रभर सतत ६ तास परिश्रम घेवून जळगाव जिल्हयांत खालील कारवाई केलेली आहे.
काय केली कारवाई….
१) १०३ हॉटेल्स, लॉजेस, ढाबे चेक केले.
२) ८०० वाहने चेक केली.
३) १५५ रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक केले.
४) ५८,६००/- रु. चा मोटार व्हिकल अॅक्ट खाली दंड वसुल करण्यात आला आहे.
५) ०८ बेलेबल वॉरंट बजावणी
६) २३ नॉन बेलेबल वॉरंटची बजावणी
७) ०१ गौण खनिज चोरीची कारवाई
८) ०२ हद्दपार आरोपीतांना अटक केली १) ०२ सराईत गुन्हेगार चोरी करण्याचे उद्देशाने मिळून आल्याने कारवाई
१०) ०१ दारुबंदीची कारवाई केली
११) ०२ ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई
(१२) ०४ महाराष्ट्र पोलीस कायदया अंतर्गत कारवाई अशा प्रमाणे मोहिमे दरम्यान मोठया प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे.