जळगाव, दि. 21 (प्रतिनिधी) :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व मॉडेल करीअर सेंटर (एमसीसी) तर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे 24 मार्च, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय आवार येथे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी खाजगी आस्थापनांनी एकूण 245 रिक्तपदांची मागणी कळविली आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता 10 वी पास, आयटिआय पास, डिप्लोमाधारक, पदवीधर (ग्रॅज्युएट) पदव्युत्तर अशी आहे.
या मेळाव्यास येताना शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इत्यादीसह उपस्थित रहावे. विभागाचे संकेतस्थळ www.mahaswayam.gov.in यावर नोंदणी केलेल्या उमेदवारांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. तसेच नाव नोंदणी न केलेल्या उमेदवारांनी देखिल शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इत्यादीसह रोजगार मेळाव्यास उपस्थित रहावे. आणि नाव नोंदणी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर करुन घ्यावी. नांवनोदणी केलेल्या किंवा नाव नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना प्राप्त झालेल्या युझर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सुविधांचा आणि माहितीचा लाभ देखील उमेदवारांना घेता येतो.
तरी जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी या जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन वि. जा. मुकणे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.