नंदुरबार शहरातील सराफ बाजारातून दागिने घडवणाऱ्या कारागिराच्या दुकानातून साडेतीन लाख रुपये किमतीची सोनेमिश्रित माती चौघांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सोमवारी पोलिसांत चार अज्ञातांविरुद्धगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यज्ञेश महेश सोनी (रा. वृंदावन नगर ) यांच्या दुकानात ही चोरी झाली. २६ रोजी त्यांच्या दुकानात आलेल्या चौघांनी ही चोरी केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.चौघांनी ३ लाख ५० हजार रूपये किमतीची ५ ते ६ किलो सोनेमिश्रितमाती चोरून नेल्याची त्यांची तक्रार आहे.
याप्रकरणी यज्ञेश सोनी यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलिस उपनिरीक्षक स्नेहदीप शिंदे करत आहेत.

