बीड : राज्यात काही केल्या महिला आणि लहान मुलींवरील अत्याचार काही कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. असाच एक भयंकर प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील बर्दापूर इथे एका ६ वर्षाच्या चॉकलेट देण्याच्या बहाण्याने एका ६० वर्षाच्या नराधमाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी नराधमाला ताब्यात घेत पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. विष्णू बाबुराव सादुळे (वय ६०) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नेमकी काय आहे घटना?
पीडित मुलगी अवघ्या ६ वर्षांची असून ती पहिल्याच वर्गात शिकत आहे. तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २ मार्चला ही चिमुकली शाळेतून घरी आल्यानंतर आपल्या मैत्रिणीसोबत खेळण्यासाठी बाहेर पडली. मात्र, खेळून आल्यानंतर ही रात्री घरात गप्पच होती. घरच्यांनी काही विचारल्यानंतर माझं पोट दुखत आहे, इतकंच सांगून शांत झाली. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा ही चिमुकली शाळेत गेली. शाळेतही ती गप्पच होती.
हे पण वाचा..
गुलाबराव पाटील उद्धव ठाकरेंवर बरसले ; म्हणाले..
31 मार्च पूर्वी ‘ही’ कामे उरकवून घ्या, नाहीतर बसेल मोठा दंड
बच्चू कडूंनी शेवटी मनातलं ओठावर आलंच; थेट मुख्यमंत्रीपदावरच केला दावा, राजकीय चर्चांना उधाण
‘बिग बी’च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी ; महानायक अमिताभ बच्चन यांचा अपघात
घरी आल्यानंतर पुन्हा प्रश्न तिला विचारल्यानंतर तिनं पोट दुखण्याचं कारण सांगितलं. मात्र, यावर घरच्यांना वेगळाच संशय आला. त्यावर या चिमुकलीला पूर्ण विश्वासात घेत वडिलांनी तिला काय घडलं असं विचारल्यानंतर या चिमुकलीने मी खेळायला गेल्यानंतर विष्णू बाबुराव सांदुळे वय वर्ष ६० हे तिथं आमच्यापाशी आले. त्यांनी मला चॉकलेट देतो म्हणून सांगितलं आणि मला त्यांच्यासोबत एका जुन्या घरात घेऊन गेले. त्यांनी तिथे माझ्यासोबत खूप घाण केलं. मला धमकी दिली की कोणाला काही सांगितलं तर मला जीवे मारतील. त्यामुळे या चिमुकलीने आपला आवाज बंद ठेवला.
विष्णू या नराधमाचा प्रकार उघडकीस आल्यांनतर त्याच्या विरोधात तक्रार दिली. पोलीसांनीदेखील तात्काळ हे प्रकरण गांभीर्याने घेत बर्दापूर पोलीस ठाण्यात विष्णू सांदुळे यांच्या विरोधात ३७६ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं आहे. मात्र, या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

