मुंबई : आज, 20 फेब्रुवारी 2023 रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. जागतिक बाजारातील मजबूत ट्रेंडमध्ये सोमवारी बाजारात सोन्याच्या दरात किरकोळ 50 रुपयांची वाढ झाली, तर दुसरीकडे आज चांदीच्या दरात 140 रुपयांची किरकोळ वाढ झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.
सोमवारी बाजारात सोन्याचा भाव 50 रुपयांनी वाढून 56,307 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 56,257 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
आज चांदी किती पोहोचली आहे?
या काळात चांदीचा भावही 140 रुपयांनी वाढून 65,770 रुपये प्रति किलोवर बंद झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, “दिल्लीतील स्पॉट सोन्याचे भाव 50 रुपयांनी वाढून 56,307 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत.”
परदेशी बाजारात सोन्याचे भाव वधारले
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,845 डॉलर प्रति औंस तर चांदीचा भाव 21.82 डॉलर प्रति औंस झाला.
जानेवारीमध्ये गोल्ड ईटीएफमधून १९९ कोटी रुपये काढले
विशेष म्हणजे शेअर बाजारातील तेजीचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी जानेवारीमध्ये गोल्ड ईटीएफमधून १९९ कोटी रुपये काढून घेतले. यासह, गोल्ड ईटीएफमधून पैसे काढण्याचा हा सलग तिसरा महिना होता. Amfi डेटानुसार, डिसेंबर 2022 मध्ये गोल्ड ETF मधून गुंतवणूकदारांनी 273 कोटी रुपये आणि नोव्हेंबरमध्ये 195 कोटी रुपये काढले. त्याआधी, ऑक्टोबरमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये 147 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती.