सध्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणी गाडी चालवताना दिसतात. अनेकदा मुली गाडीवर धोकादायक स्टंट करताना, स्टाईलमध्ये गाडी चालवताना दिसतात, ज्यामुळे अपघातही घडतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही असाच प्रकार पाहायला मिळत आहे.
एका निष्काळजी तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगी रस्त्याच्या मधोमध तिची बाईक वेडीवाकडी आणि अतिशय वेगाने बाईक चालवताना दिसत आहे. कधी डावीकडे तर कधी उजवीकडे गाडी कलवत ती तिच्याच नादात ड्रायव्हिंग करताना दिसत आहे.
मात्र तिच्या या अशाच निष्काळजी ड्रायव्हिंगमुळे मोठा अपघात होताना पाहायला मिळत आहे.व्हिडिओमधील ही तरुणी सुसाट गाडी चालवत असते. त्याचवेळी मागून एक बाईकस्वार आपल्या पत्नीसह त्या रस्त्यावरुन जाताना तो त्या मुलीच्या शेजारून जाण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी बाईक चालवणारी मुलगी अचानक त्या त्याच्या आडवी येते. ज्यामुळे बाईकवरचे जोडपे खूप जोरात खाली पडते, शिवाय ती मुलगीही खाली कोसळते.
व्हिडीओ पाहिल्यानंतर त्या दोघांनाही गंभीर जखमा झाल्या असतील असं दिसतं आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी याबद्दल संताप व्यक्त केला आहे. तसेच या तरुणीच्या हलगर्जीपणाबद्दल तिला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.