बीड : राज्यात महिलांवर होणारे अत्याचार कमी होत नाही. अशातच नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना बीडच्या गेवराई शहरातून समोर आलीय. आंघोळ करतानाचा चोरून काढलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, सख्या दिरानेच आपल्या भावजाईला ब्लॅकमेल करत बळजबरीने अत्याचार केलाय. हा दिर एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने आपल्या मावस भावाकडून देखील बळजबरीने भावजयीवर अत्याचार घडवून आणलाय. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी काय आहे घटना?
पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन, गेल्या 5 ते 6 महिन्यापुर्वी पीडितेचे पती बाहेर गेल्यानंतर आरोपी दिर हा घरी जेवन करण्यासाठी आला. त्याला पीडितेने जेवन दिले आणि किचनमध्ये निघून गेली. मात्र, यावेळी आरोपीने पीडितेला आवाज देत बोलावले आणि पीडिता अंघोळ करतानाचे चोरून काढलेले फोटो आणि व्हिडीओ दाखवले. “तू जर माझ्यासोबत शारीरीक संबंध ठेवले नाही, तर मी हे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करून व्हॉयरल करणार अशी धमकी दिली.
मात्र, पीडितेने नकार देत हा सर्व प्रकार आपल्या सासऱ्यांना सांगितला. परंतु त्यांनी माझा मुलगा असं करू शकत नाही म्हणत मुलावर विश्वास दाखवत सुनेवर विश्वास ठेवला नाही. मात्र त्यांनतर पीडिता घरात एकटी असतांना दिराने पीडितेवर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर त्याचा मावस भाऊ एकदिवस दिरासोबत घरी सोबत घरी आणले.
हे पण वाचा..
पेन्शनधारकांसाठी गुडन्यूज.. सरकारने काढला नवीन आदेश, काय आहे घ्या जाणून
जळगाव जिल्ह्यातील ‘या’ लाभार्थ्यांना मिळणार मिनी टॅक्ट्रर खरेदीवर तब्बल 90 टक्के अनुदान
कसला हा क्रूरपणा! ‘हा’ Video पाहून तुम्हीही संतापाल…
आपल्याला गाडी घेण्यासाठी त्याने मदत केली आहे, तू त्यांच्यासोबत शरीरसंबंध ठेव असे दिर पीडितेला म्हणाला. त्यावर पीडितेने नकार दिला मात्र आरोपी दिर मावस भाऊला घरी सोडून निघून गेला. त्यानंतर त्याने देखील पीडितेवर अत्याचार केला. अशा आशयाची फिर्याद पीडितेने गेवराई पोलीस ठाण्यात दिलीय.
याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात आरोपी दोन्ही आरोपींवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी (police) घटनेचे गांभीर्य ओळखून दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान या घटनेने नात्याला काळिमा फासला असून बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.