चोपडा । एकीकडे जळगाव जिल्ह्यात अवैध वाळूची सर्रासपणे चोरटी वाहतूक सुरु असून यावर कुठलीही कारवाई होताना दिसून येत नाहीय. अशातच वाळूचे ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करू देण्यासाठी व कोणतीही कारवाई न करण्यासाठी चार हजाराची लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासह एका पंटरला लाचलुचपत विभागाच्या पथकाने केली. या कारवाईमुळे वाळू वाहतूक करणाऱ्यांचे ढाबे दणादणले आहे.
नेमकं काय आहे प्रकार?
अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू वाहतूकदारांकडून चार हजारांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरटी वाळू वाहतूक करण्यासाठी ही लाच मागितली होती.
दरम्यान, वाळू वाहतूक करण्यासाठी कोणतीही कारवाई करून नये यासाठी अडावद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी याने पंटरच्या माध्यमातून ४ हजाराची लाच मागितली होती.त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. याची सत्यता पडताळणीसाठी जळगावच्या एसीबी पथकाने शनिवारी २८ जानेवारी रोजी सापळा रचून अडावद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी योगेश गोसावी आणि खासगी पंटर चंद्रकांत कोळी यांना पकडले आहे.
हे पण वाचा..
शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या ! राज्यातील ‘या’ ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
धावती रेल्वे पकडण्याच्या नादात तोल गेला अन्.. पाहा थरारक VIDEO
प्रवाशांनो लक्ष द्या ! भुसावळ- पुणे एक्सप्रेस आजपासून तब्बल दाेन महिने रद्द
धक्कादायक! चाळीसगावच्या तरुणीवर सलग दोन दिवस केला बळजबरीने अत्याचार
विशेष म्हणजे अडावद पोलीस ठाण्याच्या आवारातच खासगी पंटरने लाच स्विकारल्याने त्याला जागेवरच ताब्यात घेतले. ही कारवाई एसीबीचे उपअधिक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.