भुसावळ : एकीकडे आधीन अनेक रेल्वेगाड्या रद्द होत वा विलंबाने धावत असतांना आता भुसावळ ते पुणे हुतात्मा एक्सप्रेस आजपासून तब्बल दोन रद्द करण्यात आलेली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कर्जत स्थानकाच्या रीमॉडेलिंग कामासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे ही रेल्वे आजपासून (शनिवार) पुढील दोन महिने रद्द करण्यात आली आहे.
याबाबत रेल्वे प्रशासनाने प्रसिध्दीपत्राद्रवारे माहिती दिली आहे. या पत्रकात मुंबई रेल्वे विभागातील कर्जत स्थानकांवर यार्ड रिमॉडेलिंगचे काम होत असल्याने २८ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान पुणे – भुसावळ व २९ जानेवारी ते १ एप्रिल दरम्यान भुसावळ – पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याचे म्हटले आहे.
हे पण वाचा..
धक्कादायक! चाळीसगावच्या तरुणीवर सलग दोन दिवस केला बळजबरीने अत्याचार
10वी पाससाठी गुडन्यूज ! भारतीय डाक विभागात तब्बल 40889 पदांसाठी भरती, आताच अर्ज करा
मोठी बातमी! शिंदे गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
अरे देवा! गच्चीवर चादरीच्या आता प्रेमी युगुलाची रासलीला सुरु होती, तितक्यात आई आली अन्.. पहा VIDEO
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. दरम्यान ही रेल्वे तब्बल दाेन महिने बंद राहणार असल्याने नाशिक (nashik) जिल्ह्यासह खानदेशातील प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.