मुंबई: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी हाती आली आहे. शिंदे गटाच्या एका आमदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार संतोष बांगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आमदार बांगर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
हिंगोलीमधील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार संतोष बांगर यांनी शिवीगाळ करत मारहाण केली होती. उपाध्याय हे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राध्यापक महिलांना त्रास देतात, असा आरोप करत बांगर यांनी त्यांना मारहाण केली होती.
या मारहाणीचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. प्रकरणी आता गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मारहाण प्रकरणी आमदार बांगर यांच्यासह त्यांच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसचे महाविद्यालयातील पाच अधिकाऱ्यांवरही या संदर्भातील गुन्हा दाखल करण्यात आलाय.