नवी दिल्ली : तब्बल अडीच वर्षानंतर सोन्याचा विक्रमी भाव गाठल्यानंतर आता त्यात घसरण होताना दिसत आहे. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली. मात्र, चांदीच्या दरात वाढ झाली. 24 जानेवारी म्हणजेच मंगळवारी सोन्याच्या किमतीने 57,322 रुपये प्रति 10 ग्रॅमचा नवा विक्रम गाठला होता. ऑगस्ट 2020 मध्येही सोन्याच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठला होता आणि तो 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला होता. जर तुम्हाला अलीकडच्या काळात सोने खरेदी करायचे असेल तर हीच योग्य वेळ आहे.
दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये घट
येत्या काळात सोने 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी गाठू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चांदीचा दरही 80 हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे. गुरुवारी सराफा बाजार बंद होता. याआधी बुधवारी दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये घसरण दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर शुक्रवारी सोने आणि चांदीचे दर घसरले.
शुक्रवारी दुपारी मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 274 रुपयांनी घसरून 56688 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर दिसले. त्याचवेळी चांदीचा भाव 43 रुपयांच्या घसरणीसह 68589 रुपये प्रति किलोवर होता. तत्पूर्वी बुधवारी बंद झालेल्या व्यापार सत्रात सोने 56,962 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 68,676 रुपये प्रति किलोवर बंद झाली.
सराफा बाजारात संमिश्र कल
शुक्रवारी सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात संमिश्र स्थिती होती. शुक्रवारी इंडिया बुलियन्स असोसिएशनने (https://ibjarates.com) जाहीर केलेल्या किमतीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव ६६ रुपयांनी घसरून ५७०६२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. त्याचवेळी चांदीचा भाव 456 रुपयांनी मजबूत होऊन 68350 रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोहोचला. 23 कॅरेट सोन्याचा दर 56834 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेटचा दर 52269 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेटचा दर 42797 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.